शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

तोरणमाळ आंतरराष्ट्रीय शाळेचा उद्देश ठरला फोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 12:41 IST

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्यातील पहिल्या आंतरराष्ट्रीय शाळेला पुरेसा निधी उपलब्ध करून देवूनही स्थानिक अधिका:यांच्या उदासिनतेमुळे शाळेची अवस्था बिकट झाली आहे. विद्याथ्र्याना पुरेशा सुविधा नाहीतच, भोजन देणा:या संस्थेलाही वा:यावर सोडले आहे. कर्मचा:यांनाही मानधन दिले गेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्याचे शिक्षण  संचालक नंदकुमार यांनी संबधितांवर कारवाई करण्याच्या सुचना ...

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्यातील पहिल्या आंतरराष्ट्रीय शाळेला पुरेसा निधी उपलब्ध करून देवूनही स्थानिक अधिका:यांच्या उदासिनतेमुळे शाळेची अवस्था बिकट झाली आहे. विद्याथ्र्याना पुरेशा सुविधा नाहीतच, भोजन देणा:या संस्थेलाही वा:यावर सोडले आहे. कर्मचा:यांनाही मानधन दिले गेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्याचे शिक्षण  संचालक नंदकुमार यांनी संबधितांवर कारवाई करण्याच्या सुचना जि.प.सीईओंना यापूर्वीच दिल्या आहेत.तोरणमाळ येथे सुरू करण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या आंतरराष्ट्रीय शाळेची सुरुवात मोठा गाजावाजा करून करण्यात आली. तोरणमाळला जागा उपलब्ध नसल्यामुळे पहिल्या वर्षी ही शाळा नंदुरबारातील एकलव्य इंग्लिश मिडियम स्कुलच्या इमारतीत सुरू करण्यात आली. शाळा चालविण्यासाठी पुरेसा निधी देखील शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. असे असतांना संबधित अधिका:यांच्या उदासिनतेमुळे या शाळेचा उद्देशच सफऊ होऊ शकत नसल्याचे चित्र आहे. या शाळेच्या भोजन ठेकेदार बचत गटाला सहा महिन्यांपासून मानधनच मिळाले नसल्यामुळे त्यांनी भोजन देणे बंद करण्याचा इशारा दिला होता. त्याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच राज्याच्या शिक्षण संचालकांनी तातडीने शिक्षण परिषदेचे पथक पाठवून चौकशी केली. चौकशीत अनेक बाबी उघड झाल्या होत्या.गंभीर ठपकाचौकशी समितीने अनेक गंभीर बाबी आपल्या चौकशीत पुढे आणल्या. त्यात शाळेतील विद्याथ्र्यासाठी सोयी सुविधांसदर्भात कार्यवाहीच झाली नाही. पुरेसे अंथरूण व पांघरून व भोजनपट्टी देण्यात आल्या नाहीत. संपुर्ण हिवाळा निघून गेला तरी विद्याथ्र्याना ब्लँकेट पुरविण्यात आले नाहीत. विद्याथ्र्याना भोजन देणा:या बचतगटाला सुरुवातीपासून अर्थात सहा महिन्यांपासून मानधनच दिले गेले नाही. कंत्राटी कर्मचा:यांना अर्थात निवासी शाळा अधीक्षक, स्वयंपाकी यांनाही सुरुवातीपासून मानधनच दिले गेलेले नसल्याचा ठपका समितीने ठेवला आहे.तातडीने सुविधा..विद्याथ्र्याना तातडीने स्टेशनरी, बेड, गादी, कुशन व ब्लँकेट पुरवावे, भोजन व्यवस्था सुधारावी. पिण्याचे पाणी अर्थात जार नियमित मागवावे, परिसर स्वच्छता नियमित ठेवावी आदी सुविधा तातडीने पुरविण्याच्या सुचना या समितीने केल्या आहेत. शिवाय संबधित शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी यांनी कामात कुचराई केली असून त्यांच्यावर कारवाई करण्याचेही प्रस्तावीत करण्यात आले आहे. एस.टी.समितीकडूनही दखलनुकतीच येवून गेलेल्या विधीमंडळ एस.टी. समितीने देखील या आंतरराष्ट्रीय शाळेच्या गैरव्यवस्थापनाबाबत दखल घेतली होती. समितीने काही बाबी नोंदवून घेतल्या असून विधीमंडळाला अहवाल सादर करतांना त्या नमुद करणार असल्याचे समजते.संधीचा उपयोग व्हावाराज्यातील पहिली आंतरराष्ट्रीय शाळा सुरू होण्याचा मान जिल्ह्याला मिळाला आहे. एक मॉडेल शाळा म्हणून या शाळेचे व्यवस्थापन ठेवल्यास आणि शाळा चालविल्यास राज्यात त्याची दखल घेतली जाणार आहे. त्यामुळे संधीचे सोने करण्याची संधी असतांना संबधीत अधिका:यांच्या उदासिनतेमुळे मात्र ही संधी दुरावण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीच याबाबत गांभिर्याने दखल घेणे गरजेचे ठरणार आहे.