शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात साहित्य प्रेमींसाठी ग्रंथोत्सवाची पर्वणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 19:07 IST

नंदुरबार : नंदुरबार येथे  7 व 8 जानेवारी दरम्यान जिल्हा ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आह़े यानिमित्त साहित्यप्रेमींना साहित्याची पर्वणी ...

नंदुरबार : नंदुरबार येथे  7 व 8 जानेवारी दरम्यान जिल्हा ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आह़े यानिमित्त साहित्यप्रेमींना साहित्याची पर्वणी मिळणार असल्याने उत्साहातचे वातावरण निर्माण झाले आह़ेशासनाच्या ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्यातर्फे नंदुरबार जिल्हा ग्रंथोत्वाचे आयोजन जुने पोलीस कवायत मैदान, नंदुरबार येथे करण्यात आले आह़े ग्रंथोत्सवासाठी महाराष्ट्रातून तब्बल 30 प्रकाशन व वितरण संस्थाचे दालने प्रदर्शित होणार आह़े गेल्या आठ वर्षापासून ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येत आह़े ग्रंथदिंडीची सुरुवात 7 जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा येथून होणार आह़े सदर दिंडीमध्ये नंदुरबार शहरातील 15 माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची विविध पथके सहभागी होणार आहेत़ ग्रंथदिंडीचा शुभारंभ नगरसेविका शोभा मोरे यांच्या हस्ते होणार आह़े तसेच नगराध्यक्ष परवेज खान करामत खान यांची विशेष उपस्थिती लाभणार आह़े कार्यक्रम जिल्हाधिकारी डॉ़ मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आह़े जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, सहाय्यक जिल्हाधिकारी वान्मती सी़, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नानासाहेब बच्छाव, उद्योजक मनोज रघुवंशी, योगेंद्र दोरकर, तहसीलदार नितीन पाटील, प्राचार्या सुहासिनी नटावदकर, साहित्यिक दिनानाथ मनोहर, जिल्हा साहित्य अकादमीचे राजेंद्रकुमार गावीत, अॅड़ परिक्षिता मोडक, सूर्यभान राजपूत, जी़व्ही़ कुटे, जिल्हा ग्रंथालय संघाचे पीतांबर सरोदे उपस्थित राहतील़ 7 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता जुने पोलीस कवायत मैदान नेहरु पुतळ्याजवळ ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते होणार आह़े या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉ़ हिना गावीत तर विशेष अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक उपस्थित राहतील़ प्रमुख अतिथी म्हणून आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार अमरिश पटैल, आमदार सुधीर तांबे, आमदार किशोर दराडे, आमदार सुरुपसिंग नाईक, आमदार डॉ़ विजयकुमार गावीत, आमदार क़ेसी़ पाडवी, आमदार उदेसिंग पाडवी, नगराध्यक्ष परवेज खान, जिल्हाधिकारी डॉ़ मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधिक्षक संजय पाटील, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी रणधिर सोमवंशी, प्रकल्पाधिकारी वान्मती सी़, ग्रंथालय संचालक सु़ई़ राठोड, जेष्ठ साहित्यिक वाहरु सोनवणे, पीतांबर सरोदे उपस्थित राहतील़ मार्गदर्शक म्हणून 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख उपस्थित राहतील़ दुपारी 2 वाजता स्पर्धा परीक्षेवर मार्गदर्शन करण्यात येणार आह़े कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी तर प्रमुख वक्ते म्हणून युनिक अकॅडमीचे व्यवस्थापक राहुल पाटील उपस्थित राहतील़ प्रकल्पाधिकारी प्रदीप देसाई, युवराज भामरे, प्रवीण पाटील, प्रमोद राजपूत यांचा सहभाग राहिल़ बालकवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ़ सविता पटेल, संयोजन समितीचे प्रभाकर भावसार, विजय पाटील, सीमा मोडक, रमेश महाले उपस्थित राहतील़ 8 जानेवारी रोजी महात्मा गांधीच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त विशेष व्याख्यान ‘महात्मा गांधी आणि युवा शक्ती’ होणार आह़े डॉ़ विश्वास पाटील यांचे व्याख्यान होणार आह़े दुपारी 2 वाजता कवींचे खुले कवी संमेलन होईल़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निंबाजी बागूल असतील़ प्रमुख अतिथी म्हणून सुरेखा उदावंत, जया नेरे, प्रियंका पाटील, अंजली राणे, विश्राम पाटील, निरज देशपांडे, मितलकमुर टवाळे असतील़ सायंकाळी 6 वाजता सुरेश भट, गझल मंच पुणे प्रस्तुत गझल रंग कार्यक्रमाने ग्रंथोत्सवाचा समारोप होईल़ या वेळी प्रमुख सहभाग हेमलता पाटील, शरद धनगर, किर्ती वैराळैकर, सदाशिव सूर्यवंशी, सतिश दराडे, शिवकुमार डोयेजोडे, दास बाळासाहेब पाटील, शाहिर सुरेश वैराळकर गझल सादर करतील़ यशस्वीतेसाठी विविध समित्यांची स्थापना  केली असून उपसमितीमध्ये हैदरभाई नुरानी, पुष्पेंद्र रघुवंशी, अनिल पाटील, पिनल शहा, श्रीकांत ब:हाणपुरकर, सय्यद इसरार अली कमर अली, तेजल चौधरी, ज्ञानेश्वर पाटील, ऋृता चौधरी, डॉ़ नरेंद्र गोसावी, प्रा़ मितलकुमार टवाळे, जाकीर अहमद, कैलास मराठे, धनराज पाईल, शरद जाधव आदींचा समावेश राहिल़