नंदुरबार : डाकीण असल्याच्या संशयावरून ३५ वर्षीय महिला आणि तिच्या पतीस जमावाने बेदम मारहाण करून नग्न धिंड काढण्याचा प्रयत्न केल्याची घटना गौऱ्याचा खावल्यापाडा, ता.धडगाव येथे घडली. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध धडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गौºयाचा खावल्यापाडा येथील नाया बारका पराडके यांच्या मुलीस गावातीलच ३५ वर्षीय महिलेने तंत्रमंत्र करून व काहीतरी पदार्थ खावू घालून आजारी पाडल्याचा आरोप पराडके व त्यांच्या नातेवाईकांनी केला. महिला डाकीण असल्याचा संशय घेवून नाया बारका पराडके, दारासिंग नाया पराडके, दाबक्या बारज्या पराडके, सोमीबाई नाया पराडके व लोंगीबाई नाया पराडके सर्व रा.गौºयाचा खावल्यापाडा, ता.धडगाव यांनी महिलेला तिच्या घरी जावून बेदम मारहाण केली. तिचा पती मध्ये आला असता त्याला देखील मारहाण करण्यात आली. यावेळी जमावाने महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करून गावातून नग्न धिंड काढण्याचाही प्रयत्न केला. शिविगाळ करून ठार मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद पिडीत महिलेने दिली. त्यावरून पाचही जणांविरुद्ध महाराष्टÑ नरबळी व इतर अमानुष अघोरी विद्या प्रतिबंध कायदा, विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीतांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तपास हवालदार अडकमोल करीत आहे.
धडगाव तालुक्यात डाकीणच्या संशयावरून महिलेला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 11:36 IST