लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोना संसर्गाच्या काळात एकाच वाहनात पाच जणांना घेवून जाणा:या कारचालकासह त्यात बसलेल्या सर्वाविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सर्व जण हे सेलंबा (गुजरात) येथील आहेत. या वाहनाला सागबारा मॅजीस्ट्रेट यांनी ठराविक काळासाठी आंतरराज्य वाहतुकीचा परवाना दिला होता.चंद्रकांत गोरख लोहार, महेश जीवन प्रजापती, दिगंबर रामदास लोहार, गौरव लाला लोहार व विकास रमणलाल लोहार सर्व रा.सेलंबा असे गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी वाहतुकीवर र्निबध आहेत. शिवाय सोशल डिस्टन्सिंग ठेवून एका वाहनात बसण्यास परवाणगी आहे. असे असतांनाही 10 रोजी मध्यरात्री नंदुरबारातून एक कार गुजरातकडे जात होती. या कारमध्ये पाच जण बसलेले आढळले. पोलिसांनी कार अडवून चौकशी केली असता त्यांनी सागबारा येथील मॅजीस्ट्रेट यांनी दिलेला परवाना दाखविला. परंतु नंदुरबार जिल्ह्यात लागू असलेल्या नियम व आदेशाचा भंग झाल्याचे उघड झाल्याने कारवाई करण्यात आली.याबाबत पोलीस नाईक गिरीश दगाजी पाटील यांनी फिर्याद दिल्याने नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार बि:हाडे करीत आहे.
कारमधून जाणा:या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 12:34 IST