वसाहतीतील पायाभूत सुविधांना प्राधान्य द्या
नगर पालिकेने नगर उत्थान कार्यक्रम व १५ वा वित्त आयोगातून साधारण ११ कोटींची तरतूद केली आहे. ही निश्चितच चांगली बाब असली तरी शहराच्या हद्दीत गेल्या पाच वर्षांपासून समाविष्ट केलेल्या २५, ३० पैकी केवळ चार, पाच वसाहती वगळता इतर वसाहतींमध्ये गटारी, रस्ते व पिण्याचे पाणी या सारख्या पायाभूत सुविधा नाहीत. या वसाहतीतील रहिवाशांनी सातत्याने लोकप्रतिनिधींना साकडे घातले आहे. तरीही आतापर्यंत त्यांच्या तोंडाला पानेच पुसण्यात आली आहे. अर्थ संकल्पात मोकळ्या जागा विकसित करण्याचे नमूद केले आहे. परंतु नवीन वसाहतीतील पायाभूत सुविधांबाबत उल्लेख नाही. साहजिकच यामुळे रहिवाशांनी शंका उपस्थित केली आहे. निदान यंदा तरी पायाभूत सुविधांना प्राधान्य देऊन हा मार्गी लावावा, अशी मागणी आहे.