लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 3 : नंदुरबार पालिकेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत काँग्रेस व भाजपचे नगरसेवक एकमेकांना भिडल़े आयत्या वेळच्या विषयावरुन झालेल्या या वादात नगरसेविका संगीता सोनवणे यांच्या पतीच्या डोक्याला जबर दुखापत झाली आह़ेमंगळवारी नंदुरबार पालिकेची सर्वसाधारण सभा होती़ या वेळी आयत्या वेळेच्या विषयावरुन काँग्रेस व भाजप नगरसेवक यांच्याच प्रचंड राडा झाला़ दोन्ही गटाच्या समर्थकांनी पालिका आवारात प्रचंड गर्दी केली होती़ दोन्ही गट एकमेकांवर धावून गेल्याने प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होत़े याबाबत दोन्ही गट शहर पोलीस ठाण्यात गेले व तिथेही संबंधितांमध्ये बोलाबोल झाली़ दरम्यान, या वादाचे पडसाद सराफा बाजार व मंगळ बाजारातही जाणवल़े अफवांमुळे नागरिक सैरावैरा पळू लागल्याने शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता़
नंदुरबार पालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेविकेच्या पतीचे डोके फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 12:42 IST