नंदुरबार : जिल्ह्यातील अंगणवाडी इमारत दुरूस्ती, नवीन बांधकाम, पदभरती या विषयावर सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली. येत्या काळात नवीन अंगणवाडी बांधकामाला प्राधान्य राहणार असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांनी यावेळी दिली.जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा अध्यक्षा रजनी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दुपारी झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, सभापती दत्तू चौरे, हिराबाई पाडवी, लताबाई पाडवी यांच्यासह सर्व विषय समिती सभापती, अधिकारी व सदस्य उपस्थित होते. बैठकीत पाणी टंचाई, रस्त्यांची कामे आणि अंगणवाडी बांधकाम यावर चर्चा करण्यात आली. दुर्गम भागात अनेक अंगणवाडय़ा या कुडाच्या घरात किंवा कच्चा घरात भरत असतात. त्यामुळे नवीन अंगणवाडय़ांना मंजुरी मिळावी अशी मागणी सदस्या संध्या पाटील यांनी केली. अक्कलकुवातील केशवनगर भागात चक्क सार्वजनिक शौचालयांच्या बाजुला अंगणवाडी इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. एकीकडे प्रशासन अंगणवाडींच्या माध्यमातून कुपोषण दूर करण्याचा प्रय} करीत आहे तर दुसरीकडे अशा पद्धतीने बालकांच्या आरोग्याशी खेळले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ही जागा कुणी सुचवली व कुणी मंजूर केली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली. चौपाळे येथील तिन्ही अंगणवाडींची दुरवस्था झाली असल्याचे सागर धामणे यांनी सांगितले. नवापूर तालुक्यात अंगणवाडी भरतीत 50 हजार ते एक लाख रुपये उमेदवारांकडून घेतले जात असल्याचा आरोप रतन गावीत यांनी केला. त्याची चौकशीची मागणीही त्यांनी केली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सोमवंशी यांनी पुढील दोन वर्षात जेथे अंगणवाडी नाही तेथे नवीन बांधकाम करण्यात येईल. शिवाय दुरूस्तीलाही प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. कामांवरील स्थगिती उठलीजिल्हा परिषदेने 50-54 योजनेअंतर्गत जवळपास 27 कोटींची कामे प्रस्तावीत केली होती. या कामांबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावरील स्थगिती उठविण्यात आली असून या कामांना लवकरच सुरूवात करण्यात येणार आहे. दुर्गम भागातील ही कामे असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.दुष्काळी कामांकडे दुर्लक्षधडगाव तालुक्यातील दुष्काळी कामांसदर्भात रतन पाडवी यांनी प्रश्न उपस्थित केला. अतिदुर्गम भागातील कुपनलिकांना पाणी नाही, हातपंप नादुरूस्त आहेत. ज्या ठिकाणी कुपनलिका केल्या आहेत त्या ठिकाणी हातपंपाचे साहित्य बसविण्यात आलेले नाही. सपाटीवरील भागात कामे होतात परंतु दुर्गम व आडवळणारील गाव व पाडय़ांवर कामे केली जात नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी अशा गावांचा सव्र्हे करून लागलीच कामे करावी व टंचाईबाबत माहिती द्यावी अशा सुचना अधिका:यांना दिल्या. यावेळी इतरही विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सुरुवातीला पुलवामा अतिरेकी हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी आपला परिचय करून दिला.
अंगणवाडी इमारत दुरूस्ती, पदभरती या विषयावर गाजली सर्वसाधारण सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 12:09 IST