नंदुरबार : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावीत व त्यांचे पुत्र भरत गावीत यांची पक्षावरील नाराजी दूर करण्यात पक्षाचे महाराष्टÑाचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांना यश आले आहे. दरम्यान, २ एप्रिलचा मेळावाही भरत गावीत यांनी रद्द केला आहे.शनिवारी मुंबई येथे झालेल्या बैठकीत माणिकराव गावीत, भरत गावीत, आमदार निर्मला गावीत, जि.प. सदस्या संगीता गावीत, नाशिक जि.प.च्या उपाध्यक्षा नयना गावीत या उपस्थित होत्या. खर्गे यांनी त्यांची भूमिका जाणून घेत पक्षश्रेष्ठींची भूमिका गावीत परिवारापुढे मांडली. त्यात उभयतांचे समाधान झाल्याने नाराजीचे प्रकरण शमले.आपण पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत. पक्षश्रेष्ठींनी जी भूमिका मांडली त्यात आपले समाधान झाले. आपण काँग्रेस पक्षातच राहणार असल्याचे यापूर्वीही जाहीर केले होते. त्यामुळे नाराजीचा प्रश्नच नव्हता.
गावीत पिता-पुत्राची नाराजी दूर, खर्गे यांची मध्यस्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 12:23 IST