शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिल्लीत बोलवून फाईल दाखवली अन्...'; भाजप प्रचाराचे कारण सांगत काँग्रेसची राज ठाकरेंवर टीका
2
"राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..."
3
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
4
नरहरी झिरवाळ यांच्या 'त्या' फोटोमागचं सत्य भलेतच; खुद्द झिरवाळांनी केला खुलासा
5
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगकडे केवळ १ हजार रुपयांची संपत्ती, एवढं झालंय शिक्षण, शपथपत्रातून समोर आली माहिती
6
Adah Sharma : अदा शर्माचं शिक्षण किती?, जगतेय आलिशान आयुष्य; कोट्यवधींची मालकीण, जाणून घ्या, नेटवर्थ
7
Bank Of Baroda : ₹७.१६ डिविडंड, ₹४८८६ कोटींचा नफा; तुमच्याकडे आहे का 'या' सरकारी बँकेचा शेअर?
8
Rahul Gandhi : "काँग्रेसनेही चुका केल्या, येत्या काळात राजकारणात..."; राहुल गांधींचं मोठं विधान
9
समोरासमोर या, विकासावर होऊ दे चर्चा; मिहिर कोटेचा यांचं संजय दिना पाटलांना आव्हान
10
खळबळजनक! दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याने उघडलं हॉस्पिटल; 'असा' झाला पर्दाफाश
11
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मे रोजी महायुतीची रॅली
12
फोक्सवॅगन टायगून! 350 किमी चालविली, 1.0 लीटरचे इंजिन, वजनदार... मायलेजने चकीत केले
13
बहिणीचा व्हिडिओ पाहून माधुरी भावूक, 'डान्स दिवाने'मध्ये साजरा झाला 'धकधक गर्ल' चा वाढदिवस
14
२८,२०० मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्याचे आदेश, २० लाख नंबर्सचं पुन्हा होणार व्हेरिफिकेशन; कारण काय?
15
'सरफरोश'ची २५ वर्ष! आमिर खान- सुकन्या मोनेंची भेट.. म्हणाल्या, 'त्याचं मराठी बोलणं अन्...'
16
धक्कादायक! आई, पत्नीची केली हत्या, तीन मुलांना छतावरून फेकून केलं ठार, अखेरीस स्वत:ही संपवलं जीवन
17
"आम्ही बांगड्या घालून बसलो नाही"; गुन्हा दाखल होताच नवनीत राणांचा ओवीसींना इशारा
18
अत्यंत प्रतिकूल काळात सनातन वैदिक हिंदू धर्माचे रक्षण करणारे आद्य शंकराचार्य यांची जयंती; वाचा कार्य!
19
Lucky Sign: 'ही' चिन्ह दिसू लागली की समजून जा, वाईट काळ संपून 'अच्छे दिन' येणार!
20
"मोदींना दिल्लीत पाठवायचं ठरवलंय अन्.."; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत प्रवीण तरडेंचं भाषण गाजलं

गावठाणचे हद्दी व क्षेत्रवाद कमी होतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:44 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : देशातील ड्रोनद्वारे स्वातंत्र्योत्तर सर्वात मोठे सर्वेक्षणाचे काम राज्यात होत असून जिल्ह्यात होणा:या या सर्वेक्षणाद्वारे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : देशातील ड्रोनद्वारे स्वातंत्र्योत्तर सर्वात मोठे सर्वेक्षणाचे काम राज्यात होत असून जिल्ह्यात होणा:या या सर्वेक्षणाद्वारे गावठाण हद्द निश्चित करण्यात येईल. गावठाणामधील रहिवाशांना अचूक नकाशा व सनद उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे जमाबंदी आयुक्त आणि संचालक भुमी अभिलेख एस. चोक्कलिंगम यांनी केले.छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदीर येथे ग्राम विकास विभाग, भूमी अभिलेख विभाग व भारतीय सर्वेक्षण विभाग डेहराडून यांच्या संयुक्त सहभागाने करण्यात येणा:या नंदुरबार जिल्ह्यातील ड्रोनद्वारे गावठाण भूमापन प्रकल्प मोजणी कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. हिना गावीत, आमदार डॉ. विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, सहाय्यक जिल्हाधिकारी वसुमना पंत (नंदुरबार), अविनाश पंडा (तळोदा), निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपसंचालक भूमी अभिलेख मिलींद चव्हाण, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख महेश खडतरे आदी उपस्थित होते. चोक्कलिंगम म्हणाले, आतापयर्ंत सर्व सर्वेक्षणे पारंपारिक पध्दतीने करण्यात आली आहेत. आता ते ड्रोनच्या सहाय्याने नव्या तंत्रज्ञानाद्वारे करण्यात येणार आहे. या सव्र्हेक्षणाद्वारे जनतेला त्यांचा हक्क अचूक कागदपत्रांद्वारे मिळणार आहे.  गावठाणाच्या हद्दीतील ग्रामपंचायत मिळकत, शासनाच्या मिळकती व सार्वजनिक जागा तसेच प्रत्येक मिळकतीच्या सीमा व क्षेत्र निश्चित होतील. परिणामी गावठाणातील मिळकतींचे हद्दी व क्षेत्राचे वाद कमी प्रमाणात उद्भवतील, असे त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी डॉ. भारुड म्हणाले, ड्रोनद्वारे गावठाण मोजणी प्रकल्प हा महत्वाकांशी व जनताभिमुख प्रकल्प आहे. हा प्रकल्प जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व संबधीत अधिकारी यांनी त्यांचे कर्तव्य व त्यांना सोपविण्यात आलेल्या जबाबदा:या योग्यरितीने पार पाडाव्यात. सव्र्हेक्षणासाठी गट विकास अधिकारी यांनी तालुकास्तरावर व ग्रामपंचायत स्तरावर दर आठवड्याला आढावा घ्यावा, असे त्यांनी सांगितले.  गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत), ग्रामसेवक व तलाठी उपस्थित होते.    

या मोजणी कामामुळे गावठाणातील प्रत्येक मिळकतीचे मालकी हक्काचे मालमत्ता पत्रक तयार होईल, ग्रामपंचायतीला गावातील कर आकारणी, बांधकाम परवाणगी, अतिक्रमण निमरुलन यासाठी कायदेशीर आधार असणारा अभिलेख व नकाशा उपलब्ध होईल. याद्वारे  सर्व मालमत्ता या        मालमत्ताकराचे व्याप्तीत येतील आणि त्यामुळे ग्रामपंचायतींच्या महसूलात वाढ होईल, मालमत्ता नमुना-8 नोंदवही आपोआप तयार होईल.