लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : हतनूर धरणाचे सर्व 41 गेट उघडल्याने सारंगखेडा व प्रकाशा बॅरेज प्रकल्पात पाणीसाठा वाढणार असल्याने बॅरेजेसचे सर्वच गेट उघडण्यात येत आहेत.हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने या धरणाचे सर्व 41 गेट उघडण्यात आले आहेत. त्यामुळे सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजमध्ये पाणीसाठय़ात वाढ होणार असल्याने सोमवारी सायंकाळपासून या दोन्ही बॅरेजेसचे सर्व गेट उघडण्याचे काम सुरू झाले. दरम्यान, प्रशासनातर्फे तापी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याकडून गावात सूचना फलक लिहून दवंडीही आली आहे.दरम्यान, गेट उघडल्यामुळे तापी नदीला पूर आला असून हतनूर धरणाचे सोडलेले पाणी पोहोचल्यानंतर नदीला मोठा पूर येण्याची शक्यता आहे.
प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजचे गेट उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 12:40 IST