शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

केरोसिनऐवजी गॅस जोडणी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 12:49 IST

आढावा बैठक : धान्य पोहचविण्यासाठी वेगळी यंत्रणा, पालकमंत्र्यांच्या सुचना

ठळक मुद्देपालकमंत्री व आमदारांमध्ये निधीवरून वाद आमदार निधीतून शाळा खोलीसाठी निधी देण्याच्या मुद्दयावर आमदार उदेसिंग पाडवी व पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यात तुरळक स्वरूपात वाद झाला. गौण खनिजच्या रॉयल्टीपोटी जमा झालेल्या एक कोटी 18 लाख रुपयातून त्या त्या भागातील वि

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अतिदुर्गम भागातील आदिवासींर्पयत धान्य वेळेत पोहोचेल असे नियोजन करावे. केरोसिनऐवजी थेट गॅस जोडणी देण्यात यावी असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात शनिवारी दुपारी विविध शासकीय समित्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी पालकमंत्री रावल बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार उदेसिंग पाडवी, आमदार शिरीष चौधरी, जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर जिल्हाधिकारी अनिल पाटील आदी उपस्थित होते.पालकमंत्री रावल म्हणाले, दक्षता समितीची बैठक नियमितपणे आयोजित करीत पुरवठा विभागाच्या कामांचा आढावा घेण्यात यावा. केरोसिन ऐवजी गॅस जोडणी देता येईल का याची तपासणी करावी. जिल्ह्यातील धान्य गोदामांची कामे 26 जानेवारी 2018 पूर्वी पूर्ण करावीत. त्यासाठी तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाने नियमितपणे आढावा घ्यावा. कमी भावाने शेतमाल खरेदी करणा:या व्यापा:यांवर कारवाई करावी.रोजगार हमी योजनेची कामे प्रत्येक जॉबकार्ड धारकास मिळतील, असे नियोजन करावे. रोजगार हमी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. शासकीय अधिकारी व कर्मचा:यांनी सोशल मिडियाचा अधिकाधिक वापर करीत शासकीय योजनांची माहिती जनतेर्पयत पोहोचविली पाहिजे, असेही पालकमंत्री रावल यांनी नमूद केले. उपजिल्हाधिकारी अर्चना पठारे यांनी रोजगार हमी योजनेच्या कामांबाबत माहिती दिली. दिव्यांगांसाठी असलेला निधी संबंधित विभागांनी वेळेत खर्च केला पाहिजे. त्यासाठी नियोजन करावे, असेही पालकमंत्री रावल यांनी सांगितले. या वेळी खनिकर्म, पुरवठा विभाग, नरेगा समिती, अपंग निधी खर्चाचा सविस्तर आढावा घेतला. प्रास्ताविक जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी केले. या वेळी विविध समित्यांवर नियुक्ती समिती सदस्य अशासकीय सदस्य उपस्थित होते.भक्त निवासाचे भुमिपूजनपालकमंत्री रावल यांच्या हस्ते पर्यटनक्षेत्र विकास अंतर्गत इमाम बादशाह दर्गा परिसरात विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यात भाविकांसाठी पाय:या, संरक्षक भिंत, सभामंडपाचे काम करण्यात येणार आहे. या कामांसाठी 50 लाख रुपयांचा खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. भूमिपूजन सोहळ्यास आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार शिरीष चौधरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अ.ल. पवार आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच श्री क्षेत्र गजानन महाराज मंदिराच्या सभामंडप, पारायण सभागृह व भक्तनिवास बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. पुरुष व महिलांसाठी प्रत्येकी दोन हॉल, स्वतंत्र शौचालय बांधण्यात येणार आहे. या कामासाठी एक कोटी आठ लाख रुपयांचा खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.