बोरद : प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत बोरद येथे शुक्रवारी 1 हजार 300 लाभाथ्र्याना खासदार डॉ़ हिना गावीत व आमदार डॉ़ विजयकुमार गावीत यांच्या हस्ते गॅस वाटप करण्यात आल़े कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ़ विजयकुमार गावीत उपस्थित होत़ेकार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण पवार यांनी केल़े शुक्रवारी बोरद येथील ग्रामसचिवालय कार्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला़ या वेळी दिल्ली येथील नोडल अधिकारी आऱक़े गिरधर, नगराध्यक्ष अजय परदेशी, सहाय्यक गटविकास अधिकारी आऱबी़ सोनवणे, भारती पवार, रुपसिंग पाडवी, रविंद्र वरसाळे, कांतीलाल पाडवी, स्वप्नील बैसाणे, जितेंद्र पाडवी, प्रवीण वळवी, संगिता वरसाळे, अनील राजपूत, राजेंद्र राजपूत, बळीराम गावीत,कृष्णा गावीत आदी उपस्थित होत़ेउज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत देशभरातील 5 कोटींहून अधिक महिलांना मोफत गॅसचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती खासदार डॉ़ गावीत यांनी दिली़ यामुळे जंगलतोडीला आळा बसेलच परंतु या शिवाय त्यांना सरपनातून निघणा:या धुरापासूनही मुक्ती मिळणार असल्याचे सांगण्यात आल़े अनेक महिलांना या धुरामुळे दम्याचा आजार जडत असतो़ त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचेही या वेळी सांगण्यात आल़े गॅस जोडणीमुळे वृक्षतोड थांबून परिणामी पर्यावरणाची :हास होणे थांबणार आह़े त्यामुळे प्रत्येकाने गॅस जोडणीचा लाभ घ्यावा असे आवाहन या वेळी करण्यात आल़े याबाबत लोकसभेच्या अधिवेशनात वेळोवेळी आपण पाठपुरावा केल्याचे डॉ़़ हिना गावीत यांनी सांगितल़े जिल्ह्यातील दारिद्रय रेषेखालील 60 हजार लाभाथ्र्याना घरकुल मंजुर झाले आह़ेतसेच जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगारांना मोबाईल, इंटरनेट सेवा देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशिल असल्याची माहिती कार्यक्रमात देण्यात आली़
बोरद येथे ‘उज्ज्वला’ योजनेअंतर्गत गॅस वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 12:18 IST