शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भविष्यात पाण्याचे दुर्भिष्य जाणवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 10:58 IST

डॉ़ राजेंद्रसिह : जलव्यवस्थापनाबाबत गावो-गावी जनजागृती आवश्यक

ठळक मुद्देनंदुरबार, यवतमाळ जिल्हे प्रायोगिक तत्वावर जल व्यवस्थापनाच्या संदर्भात राज्यातील नंदुरबार व यवतमाळ हे दोन जिल्हे शासनाने प्रायोगिक तत्वावर घेतले आहे. या जिल्ह्यामध्ये जलसंधारणाची कामे सुरू झालेली आहेत. यासाठी गावक:यांनी जल व्यवस्थापनाच्या सुक्ष्म आराखडा त

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : सध्या मुबलक प्रमाणात पाणी असले तरी भविष्यात पाण्याचे दुर्भिष्य जाणवणार आहे. त्यामुळे आतापासूनच पाण्याचे व्यवस्थापन करा. यासाठी गट बनवून त्यात अनुभवी व्यक्तींसोबत महिला, तरूणींचा समावेश करून गावा-गावात जलव्यवस्थापनाबाबत जनजागृती व्हावी अशी अपेक्षा जलतज्ज्ञ डॉ.राजेंद्रसिंह यांनी व्यक्त             केली़तळोदा तालुक्यातील कालीबेल येथे लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने पाणी परिषद घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी यशदाचे समन्वयक डॉ.सुमंत पाडे, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, तहसीलदार योगेश चंद्रे, तालुका कृषी अधिकारी प्रविण भोर, प्रा.जयपाल शिंदे,              सरपंच मान्याभाऊ पावरा,            नाटय़ाभाऊ पावरा आदी उपस्थित होते. डॉ.सिंह गावक:यांना मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, सद्या             मोठय़ा प्रमाणात दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. वाळवंटा पेक्षा इकडे ब:याच प्रमाणात मुबलक पाणी आहे. मात्र भविष्यात पाण्याचे दुर्भिष्य जानवण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावक:यांनी आतापासूनच गावाचे, परिसराचे जलव्यवस्थापन केले पाहिजे. त्यासाठी उस, केळी सारखी पाण्याची पिके घेऊ नका. कमी पाण्यात येणारी पिके घ्या. शिवाय गावा-गावात ग्रामस्थांमध्ये जलव्यवस्थापनाबाबत जनजागृती करा. याकरीता गट बनवून त्यात अनुभवी व्यक्ती, महिला व तरूणांना सहभागी करून जलव्यवस्थापन करणा:या आदर्श गावांना भेटी द्या, असेही त्यांनी सांगितल़े या वेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील मेंढालेखा या आदिवासी गावाचे उदाहरण दिले. या गावात फक्त 75 कुटुंबे राहतात.              त्यांनी पाण्याचे  उत्तम व्यवस्थापन केल़े शासनाने त्यांना 1200                   हेक्टर जमीन देवून बांबूची लागवड केली. त्यामुळे त्यांना शासनाचा प्रचंड निधी मिळून गावाचा विकास साधला आहे. आपणही या गावाचा आदर्श घेत प्रत्येकाने जल व्यवस्थापन केल्यास पाण्याचे दुर्भिष्य जाणवणार नसल्याचेही ते म्हणाल़े  या वेळी यशदाचे डॉ.पांडे, प्रतिभा शिंदे, तहसीलदार चंद्रे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचानल निशांत मगरे तर आभार दिलवरसिंग वळवी यांनी मानले. कार्यक्रमास कालीबेल गावातील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.