शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यातील 23 देवस्थानांना निधीद्वारे ‘चकाकी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 12:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा नियोजन समितीने जिल्ह्यातील 22 क वर्ग आणि एक ब वर्ग अशा 23 देवस्थानांना 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आह़े यातून या तीर्थस्थळांचे रूप पालटणार असून भाविकांच्या सुविधेच्या कामांना प्राधान्य देण्यावर भर राहणार आह़े भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या धार्मिक स्थळांचा कायापालट करून भाविकांसाठी सोयी निर्माण करण्याची मागणी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा नियोजन समितीने जिल्ह्यातील 22 क वर्ग आणि एक ब वर्ग अशा 23 देवस्थानांना 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आह़े यातून या तीर्थस्थळांचे रूप पालटणार असून भाविकांच्या सुविधेच्या कामांना प्राधान्य देण्यावर भर राहणार आह़े भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या धार्मिक स्थळांचा कायापालट करून भाविकांसाठी सोयी निर्माण करण्याची मागणी सातत्याने जिल्ह्यातून होत होती़ यात ब आणि क दर्जा प्राप्त देवस्थानांवर भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा नियोजन समितीने 2018-19 या वर्षासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करून त्याचे वाटप सुरू केले आह़े यातून ठिकठिकाणी भक्त निवास, पाणी पुरवठा योजना, दुरुस्त्या, सभागृह बांधकाम याची कामे करण्यात येत आहेत़ यातून पर्यटन आणि श्रद्धा या दोन्हींचा मेळ घालून जिल्ह्याचा लौकिक वाढवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करणार आह़े क वर्ग दर्जा मिळावा यासाठी जिल्ह्यातील दोन मंदिरांकडून प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाला देण्यात आला आह़े यात हळदाणी व डोकारे ता़ नवापूर येथील देवस्थांनाचा समावेश आह़े चौपाळे ता़ नंदुरबार येथील संत दगा महाराज मंदिरालाही क दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधिन आह़े याठिकाणी क दर्जा मिळाल्यास विविध सोयींची निर्मिती शक्य होणार आह़े सातपुडय़ाच्या दुर्गम भागात 9 ठिकाणांना विशेष स्थळांचा दर्जा देण्यात येणार आह़े  पालकमंत्री तथा पर्यटन विकासमंत्री जयकुमार रावल यांनी या प्रस्तावांना मंजुरी दिली आह़े यानुसार तोरणमाळ पर्यटन स्थळाचा विकास करणे, अक्राणी महल किल्ल्याचे जतन करणे, अस्तंबा-माथा असलीपासून अस्तंबार्पयत पाय:या करून, हिराजा डोंगराचा रस्ता विकास, तिनसमाळ  व पौला पर्यटन केंद्र तर भूषा गावाला धार्मिक व पर्यटनस्थळ, नर्मदा नदी किना:यावर पर्यटकांना बोट प्रवास, भादल ते डनेल असा नर्मदा नदीचा प्रवास बोटीने करणे यासाठी निधी प्राप्त होण्याची शक्यता आह़े नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ-शनीमंदिर, मरिमाता मंदिर-निंभेल, महादेव मंदिर- कोपर्ली, काकेश्वर मंदिर-भालेर, मरिमाता मंदिर- होळ तर्फे रनाळे, देवमोगरा माता मंदिर- भांगडा, काठोबा देवस्थान- अक्राळे, काळमदेव मंदिर-इंद्रीहट्टी येथे सुविधांसाठी निधी देण्यात आला आह़े अक्कलकुवा तालुक्यातील डाब येथील याहामोगी माता मंदिर, अंबिका माता मंदिर-खापर, रामदेवबाबा मंदिर आमलीफळी खापर, काठी, माँ कालिका मंदिर-सोरापाडा़ धडगाव तालुक्यातील अस्तंबा देवस्थान, तोरणमाळ येथील गोरक्षनाथ मंदिऱ तळोदा तालुक्यातील संत गुलाम महाराज समाधीस्थळ-रंजनपूर (मोरवड), विठ्ठल मंदिर-रांझणी़ नवापूर तालुक्यातील कोठडा येथील महादेव मंदिर या देवस्थानाला क दर्जा प्राप्त असून तेथेही सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत़ वर्षाला 1 लाखांपेक्षा अधिक भाविकांची उपस्थिती आणि दिवसाला 300 च्या जवळपास भाविकांकडून दिल्या जाणा:या भेटी यातून मंदिरांना दर्जा देण्याची पद्धत आह़े यात पोलीस अधीक्षकांचे प्रमाणपत्र देण्याची अट आह़े जिल्ह्यातील जवळजवळ सर्व देवस्थानांना बाहेरगावाहून आलेले पर्यटक भेट देत असल्याने इतर स्थळांचा क दर्जाच्या तीर्थस्थळात समावेश करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े सारंगखेडा ता़ शहादा येथील दत्त मंदिराला ब वर्ग दर्जा प्राप्त असून त्यासाठीही जिल्हा नियोजन समितीकडून विविध सोयींसाठी निधी खर्च करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े