शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

शहादा प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 12:51 IST

लोकसंघर्ष मोर्चा : पाच तास ठिय्या आंदोलन, वनअधिकार कायद्याच्या अंमलबजावणीची मागणी

शहादा : धडगाव तालुक्यातील वनअधिकार कायद्यातील जनपक्षीय अंमलबजावणी व्हावी, 73 वनगावे तात्काळ महसूली करण्यात यावीत यासह विविध मागण्यांसाठी लोकसंघर्ष  मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.  मागण्या मान्य होईर्पयत  या कार्यालयावर पाच तास ठिय्या आदोलन करण्यात आले.  अखेर सर्व मागण्यांवर सकारात्मक चर्चा होऊन त्यांचा तात्काळ निपटारा करण्याचे लेखी पत्र प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर  यांच्या सहीनिशी आदोलकांना देण्यात आले.शहादा प्रांताधकारी कार्यालयावर प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो आदोलकांचा वनअधिकार कायद्याची जनपक्षीय अमंलबजावणी होण्यासाठी मोर्चा नेण्यात आला. शहरातील मार्केट यार्डपासून मोर्चाला सुरुवात होऊन बसस्थानक, डोंगरगाव रोड, पटेल रेसीडेन्सी चौकमार्गे प्रांताधिकारी कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला. त्याठिकाणी घेराव घालत विविध घोषणा देण्यात आल्या. या वेळी प्रतिभा शिंदे यांनी मोर्चेक:यांना मार्गदर्शन केले.धडगाव तालुक्यातील 73 वनगावे महसुली करण्यात यावीत, वनजमीनधारकांचे अंशत: मंजूर केलेले पट्टे सर्व दावेदारांना पूर्णत: मंजूर करून तसा सातबारा उतारा तात्काळ देण्यात यावा, पाच हजार वनदावे प्रक्रियेमध्ये घ्यावेत, देवघरे समितीची यादी वनअधिकार समितींना उपलब्ध करून द्यावी. दावे मंजूर झालेल्या वनजमीन धारकांचे सपाटीकरण व बागायती करणे या योजना लागू कराव्यात, त्यांना तात्काळ पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, लेगापाणी ते गोरांबा व बिजरी-सिरसानी ते बोदला या पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील निकृष्ट रस्ता कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई व्हावी आदी मागण्या मंजूर झाल्याशिवाय न उठण्याचा निर्धार आदोलंकानी केला. त्यांनी सुमारे पाच तास या कार्यालयात ठिय्या आंदोलन केल्याने प्रशासनाची धावपळ उडाली.या वेळी झालेल्या बैठकीस शहाद्याचे तहसीलदार मनोज खैरनार, धडगावचे तहसीलदार शाम वाडकर, गटविकास अधिकारी श्रीराम कागणे, वनक्षेत्रपाल अनिल पवार, उपविभागीय कृषी अधिकारी गावीत, एकात्मिक आदिवासी प्रकल्पाचे अधिकारी, धडगाव व शहाद्याचे कृषी अधिकारी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. मोर्चादरम्यान पोलीस निरीक्षक संजय शुक्ल व सहका:यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.