शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय प्रवेशाबाबत नवापूरात 16 लाखात फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 12:40 IST

एमबीबीएस प्रवेश : अंबेजोगाई येथील पाच जणांवर गुन्हा

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 22 : एमबीबीएस साठी प्रवेश मिळवून देतो असे सांगून आंबेजोगाई येथील पाच जणांनी नवापूर येथील एकाची 16 लाखात फसवणूक केल्याची घटना घडली. याप्रकरणी नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नवापूर येथील मोहम्मद आसीफ सुलेमान बदुडा यांनी आपल्या मुलीला वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यास क्रमासाठी प्रवेश मिळावा यासाठी आंबेजोगाई येथील महादेव तुकाराम उजगरे व इतरांशी नोव्हेंबर 2016 मध्ये संपर्क साधला. त्यांनी प्रवेशासाठी 23 लाख रुपये लागतील असे सांगितले. त्यानुसार बदुडा यांनी 23 लाख रुपये दिले देखील. परंतु मुलीचा एमबीबीएसला काही नंबर लागला नाही. बदुडा यांनी पैसे परत मागितले असता सात लाख रुपये परत दिले. उर्वरित पैसे देण्यास त्यांनी टाळाटाळ केली. पैसे मागण्यासाठी पुन्हा पुणे येथे आल्यास गुंडाकरवी ठार मारण्याची धमकी देखील दिली. याबाबत मो.आसीफ सुलेमान बदुडा यांनी नवापूर पोलिसात फिर्याद दिल्याने महादेव तुकाराम उजगरे, मिराबाई महादेव उजगरे, सूर्यकांत तुकाराम उजगरे, श्रीकांत तुकाराम उजगरे व नंदकुमार मुकंद पोटभरे सर्व रा.प्रबुद्ध नगर, आंबेजोगाई, जि.बीड यांच्याविरुद्ध फसवणुकीसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक भंडारे करीत आहे.दरम्यान, यापूर्वी देखील बीड येथीलच काही जणांनी फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला होता. आता ही दुसरा प्रकार आहे.