शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ फरशीपुलावर चौथ्यांदा भराव : रांझणी-पाडळपूर रस्त्याची कैफियत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 12:04 IST

रांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणी-पाडळपूर रस्त्यावरील फरशीपुल गेल्या तीन वर्षापूर्वी वाहुन गेला होता़ त्यानंतर प्रशासनाकडे वारंवार पुलाबाबत मागणी करण्यात आली़ पुलाअभावी दळणवळण सेवांमध्ये अडथळे निर्माण होत असल्याने परिसरातील ग्रामस्थांनी लोकसहभागातून चौथ्यांदा वाहुन गेलेल्या पुलाच्या ठिकाणी भराव  टाकून हा रस्ता वाहतुकयोग्य केला आह़ेतीन वर्षापूर्वी पावसाळ्यात नाल्याला आलेल्या पुरामध्ये रस्त्यावर भलेमोठे भगदाड ...

रांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणी-पाडळपूर रस्त्यावरील फरशीपुल गेल्या तीन वर्षापूर्वी वाहुन गेला होता़ त्यानंतर प्रशासनाकडे वारंवार पुलाबाबत मागणी करण्यात आली़ पुलाअभावी दळणवळण सेवांमध्ये अडथळे निर्माण होत असल्याने परिसरातील ग्रामस्थांनी लोकसहभागातून चौथ्यांदा वाहुन गेलेल्या पुलाच्या ठिकाणी भराव  टाकून हा रस्ता वाहतुकयोग्य केला आह़ेतीन वर्षापूर्वी पावसाळ्यात नाल्याला आलेल्या पुरामध्ये रस्त्यावर भलेमोठे भगदाड पडले आह़े यातच रांझणी-पाडळपूर रस्त्यावरील फरशीपुलही वाहून गेला होता़ परंतु तीन वर्ष लोटली गेल्यावरही यावर प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही़ त्यामुळे परिणामी परिसरातील ग्रामस्थांना दळणवळणासाठी मोठय़ा प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आह़े सध्या उसतोड, पपई, केळी काढणी सुरु आह़े यामुळे आपली  शेतीमालाची वाहने कशी काढावी असा प्रश्न शेतक:यांकडून विचारण्यात येत आह़े शिवाय या मार्गावरुन वाहन नेल्यास शेतमालाचे व वाहनाचे मोठय़ा प्रमाणात नुकसानही होत आह़े त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े दरवर्षी प्रमाणे यंदाही शेतक:यांकडून स्वखर्चाने भराव टाकून रस्ता काही प्रमानात वाहतुकीस योग्य बनविण्यात आला आह़े दरवर्षी प्रमाणे यंदाही शेतक:यांना आपापल्या रस्त्यावर भराव व डागडूज्जी केली असून आपली शेतीमालाची वाहने व्यवस्थित निघतील अशी व्यवस्था करुन घेतली आह़े परंतु पावसाळ्यात शेतीशिवारात वावर करावा कसा? असा प्रश्नही शेतक:यांकडून उपस्थित करण्यात येत आह़े रस्त्याच्या भरावासाठी शेतक:यांकडून लोकसहभागातून पैसा गोळा करण्यात आला होता़ वाहुन गेलेल्या फरशी पुलावर भराव टाकण्याची  ही चौथी वेळ आह़े या  फरशी पुलावर दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य वेस्तादादा पावरा यांनी तर एक वेळा शेतक:यांकडून  स्वखर्चाने भराव टाकण्यात आला आह़े