लोकमत न्यूज नेटवर्कलहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील लहान शहादे येथील गावतलाव चार वर्षाच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर ओसंडून वाहिला़ तलावातून ओसंडून वाहणारे पाणी पाहण्यासाठी ग्रामस्थांनी भर पावसात काठावर हजेरी देत आनंद व्यक्त केला होता़ बुधवारी सायंकाळी आणि गुरुवारी पहाटेपासून लहान शहादा व शिंदे परिसरात पावसाने जोर धरला होता़ नंदुरबार तालुक्याच्या गुजरात लगतच्या पट्टय़ातील गावांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने नदी-नाले दुथडी भरुन वाहू लागले होत़े परिणामी लहान शहादे गावातील तलावाचा स्त्रोत असलेल्या नाल्याला पाणी आल्याने सकाळी आठ वाजेदरम्यान सांडव्यावरुन पाणी वाहू लागले होत़े गत तीन वर्षात सातत्याने खोलीकरणासह पिचिंग व सांडवा दुरुस्तीची कामे करुन ग्रामस्थांनी गावतलाव सुस्थितीत ठेवला होता़ परंतू मुबलक पावसाअभावी हा तलाव पूर्ण क्षमतने भरलेला नव्हता़ गुरुवारी तलाव पूर्ण भरल्यानंतर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केल़े या भागात गेल्या महिन्यापासून दमदार पावसाची प्रतिक्षा होती़ पावसाअभावी पिकांची स्थिती दयनीय झाली होती़ कूपनलिकांमध्ये पाणी नसल्याने शेतक:यांना बागायती पिके करण्यास अडचणी येत होत्या़ पावसामुळे भूजलात वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले आह़े
चार वर्षानंतर ओसंडून वाहिला गाव तलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 12:22 IST