शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

इमारतीत मधमाशांच्या चाव्यात नगरसेवकासह चारजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 12:01 IST

जिल्हाधिकारी कार्यालय : अर्धा ते पाऊण तास झाली पळापळ

नंदुरबार : जिल्हाधिकारी कार्यालयात मधमाशांच्या चाव्याने नगरसेवकासह कार्यक्रमासाठी आलेल्या तीन ते चार अंगणवाडी सेविका जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे प्रशासकीय इमारतीत काही काळ गोंधळाचे वातावरण झाले. परिणामी कर्मचा:यांनी आपापले कार्यालयाच्या खिडक्या बंद केल्याने पुढील अनर्थ टळला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या तिस:या मजल्यावर गेल्या अनेक दिवसांपासून मधाचे पोळे आहे. दिवसेंदिवस ते मोठे होत आहे. इतरही ठिकाणी लहान मोठे पोळे आहेत. आतार्पयत या मधमाशांपासून कर्मचारी किंवा सामान्य नागरिकांना काहीही त्रास झाला नव्हता. परंतु मंगळवारी मधमाशा अचानक चवताळल्या. दुपारी तीन वाजेच्या सुमारास चवताळलेल्या मधमाशा मुख्य इमारतीच्या पहिल्या व दुस:या मजल्यावर पसरल्या. याच वेळी जिल्हाधिकारी कार्यालयात कामे घेवून आलेले भाजपचे नगरसेवक देखील होते. अभ्यागत कक्षाच्या जवळच अचानक आलेल्या मधमाशांनी तेथे उभे असलेल्यांना चावा घेण्यास सुरुवात केली. त्यात नगरसेवक प्रशांत चौधरी यांना मोठय़ा प्रमाणावर मधमाशांनी चावा घेतल्याने त्यांना मोठय़ा प्रमाणावर ईजा झाली. याशिवाय श्रमधन कार्यक्रमासाठी आलेल्या तीन ते चार अंगणवाडी सेविका महिलांना देखील मधमाशांनी चावा घेतला. सर्वानी जिल्हा रुग्णालयात जावून उपचार घेतला. अचानक चवताळलेल्या मधमाशांमुळे जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीत एकच धावपळ उडाली. अनेक कार्यालयातील कर्मचा:यांनी कार्यालयाच्या खिडक्या व दारे बंद करून घेतली तर मुख्य गेट देखील काही काळ बंद करून घेण्यात आले. साधारणत: अर्धा ते पाऊण तासानंतर मधमाशा परत गेल्याने कर्मचारी व तेथे आलेल्या नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, या ठिकाणी असलेल्या मधमाशाच्या लहान, मोठे पोळे हटवावे अशी मागणी कर्मचा:यांकडून करण्यात येत आहे. यापुढेही असा प्रकार झाल्यास समस्या निर्माण होऊ शकते. ज्या कार्यालयाच्या भिंतीवर मधाचे पोळे आहे त्या कर्मचा:यांना जीव मुठीत घेवूनच दिवस काढावा लागत असल्याचे सांगण्यात आले.