शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वेगवेगळ्या अपघातात जिल्ह्यात चारजण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 12:40 IST

वैद्यकीय अधिका:यासह दोन महिलांचा मृतांमध्ये समावेश, कौठळ, अक्कलकुवा व तळोद्यातील घटना

नंदुरबार : जिल्ह्यात वेगवेगळ्या तीन अपघातांमध्ये चारजण ठार झाल्याची घटना घडली. कवठळनजीक वैद्यकीय अधिकारी व आणखी एकजण, अक्कलकुव्यात प्रवासी महिला तर तर नवागाव येथेही महिलेचा समावेश आहे. शहादा-कहाटूळ रस्त्यावर शुक्रवारी दुपारी अपघात झाला. कहाटूळ आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी असलेले डॉ.रमेश मोहन पाटील (54) हे शहादाकडून कहाटूळ गावाकडे आपल्या दुचाकीने (क्रमांक एमएच 39 एच 4722) जात होते. त्यांच्यासोबत डीडीसी बँकेत शिपाई म्हणून कार्यरत असलेले प्रताप दामू शिरसाठ होते. गावाजवळील वळणावर समोरून कापूस भरून आलेल्या अॅपे रिक्षाने (क्रमांक एमएच 15 सीके 4614) जबर धडक दिली. त्यात दुचाकीवरील डॉ.रमेश पाटील व प्रताप शिरसाठ हे जबर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर अपघातानंतर रिक्षा देखील उलटल्याने रिक्षातील हेमंत माळी व दौलत माळी हे दोनजण जखमी झाले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत शहादा पोलिसात उशीरार्पयत अपघातान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.दुसरी घटना अक्कलकुवा बसस्थानकात घडली. बसखाली चिरडल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला.  चालकाविरुद्ध अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गेनाबाई किर्ती वसावे (40) रा.काकर्दापुनर्वसन, ता.शहादा असे मयत महिलेचे नाव आहे. अक्कलकुवा बसस्थानकात बस (क्रमांक एमएच 20 बीएल 0117) वळणावरून येत असतांना चालकाकडील बाजुने मागील चाकाखाली गेनाबाई वसावे आल्या. त्यात त्या चिरडल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत पोलीस नाईक विजू वसावे यांनी फिर्याद दिल्याने चालक जितेंद्र सुरसिंग मोरे, रा.नंदुरबार यांच्याविरुद्ध अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार मुकेश पवार करीत आहे. तिसरी घटना तळोदा तालुक्यात घडली. दुचाकीवरून पडल्याने जखमी झालेल्या महिलेचा सुरत येथे उपचार घेतांना मृत्यू झाला. संगिता बहादुरसिंग वळवी (28) रा.नवागाव, ता.तळोदा असे मयत महिलेचे नाव आहे. महिला दुचाकीवरून पडल्याने गंभीर जखमी झाली होती. तिला तातडीने स्थानिक आणि त्यानंतर सुरत येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार घेतांना तिचा मृत्यू झाला. याबाबत तळोदा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार जाधव करीत आहे.