शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडय़ांची तपासणीसाठी चार सदस्यीय पथक स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 11:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पेसा क्षेत्रात काम करणा:या अधिकारी-कर्मचा:यांनी बालके कुपोषीत राहू नये यासाठी संवेदनशीलतेने आणि तत्परतेने काम ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पेसा क्षेत्रात काम करणा:या अधिकारी-कर्मचा:यांनी बालके कुपोषीत राहू नये यासाठी संवेदनशीलतेने आणि तत्परतेने काम करावे अशा सुचना जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी दिल्या. दरम्यान, अंगणवाडय़ांना अचानक भेट देण्यासाठी चार सदस्यीय पथक नियुक्त करण्यात येणार आहे. नवसंजीवनी आणि गाभा समितीची बैठक बुधवारी झाली. त्यावेळी जिल्हाधिकारी मंजुळे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सहायक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पुरवठा अधिकारी जितेंद्र भांगरे, सामाजिक कार्यकत्र्या प्रतिभा शिंदे, डॉ.कांतिलाल टाटीया उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी मंजुळे म्हणाले, बालकांना स्थानिक स्तरावर उपलब्ध होणारा पोषण आहार देता यावा यासाठी महिला व बालविकास आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा. वैद्यकीय अधिका:यांनी आरोग्य केंद्रात उपस्थित राहून बालकांची वेळेवर तपासणी व उपचार होतील याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. नवसंजीवनीच्या संवेदनशील भागात 18 जूनर्पयत जलशुद्धीकरणाचे औषध घरोघरी वाटप करण्यात यावे. बालविकास प्रकल्प अधिका:यांनी आठवडय़ातील दोन दिवस अंगणवाडय़ांना अचानक भेट देवून कामकाजाची पाहणी करावी. या भागात धान्यपुरवठा पाऊस येण्यापूर्वी होईल याची दक्षता घ्यावी अस निर्देश देखील त्यांनी दिले. शिवाय अंगणवाडय़ांना भेट देण्यासाठी चार सदस्यांचे पथक स्थापन करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी यांनी    दिल्या.जिल्हा परिषद सीईओ गौडा  यांनी कमी वजनाच्या बालकांवर करण्यात येणारे उपचार व त्यांची वैद्यकीय तपासणीबाबत माहिती  सादर करण्याचे निर्देश दिले. अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षकांना मोबाईल देण्यात येत असून अॅपच्या माध्यमातून त्यांच्या कामकाजाची माहिती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.धडगाव तालुक्यातील 18 गावे आणि अक्कलकुवा तालुक्यातील 11 गावात चार महिन्यांचे धान्य पोहचविण्यात आले आहे. शहादा तालुक्यातील आठ गावात दोन महिन्यांचे धान्य देण्यात आले असून येत्या काही दिवसात तळोदा तालुक्यातील गावांमध्येही धान्य पोहचणार असल्याची माहिती    जिल्हा पुरवठा अधिकारी गौडा यांनी दिली.