शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

खांडबाऱ्यातील गोडावूनमधून चार लाखांचा अवैध गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 11:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापुर तालुक्यातील खांडबारा येथून पोलीसांनी बंदी असलेला ४ लाख रुपयांचा गुटख्याचा साठा एलसीबीच्या पथकाने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नवापुर तालुक्यातील खांडबारा येथून पोलीसांनी बंदी असलेला ४ लाख रुपयांचा गुटख्याचा साठा एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतला़ किराणा दुकानाच्या मागे असलेल्या गोडावूनमध्ये हा गुटखा लपवण्यात आला होता़खांडबारा गावातील मुख्य बाजारपेठेत सुंदर भगवानदास दामेचा याच्या मालकीच्या किराणा दुकानात गुजरात राज्यातील गुटखा आणून त्याचा साठा करण्यात येऊन विक्री होत असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती़ त्यानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांच्यासह पथकाने बुधवारी खांडबारा येथे भेट देत दामेचा याच्या दुकानाची झडती घेण्यास सुरुवात केली होती़ यावेळी दुकानमालक दामेचा याने किराणा दुकान चालवून ‘गुजराण’ करत असल्याचे सांगत उडवाउडवीची उत्तरे दिली होती़ दरम्यान पथकाने दुकानाच्या मागील बाजूस असलेले गोडावूनमध्ये तपास केला असता, त्याठिकाणी बंदी असलेला पान मसाला, गुटखा असा एकूण ४ लाख ३४ हजार २५८ रुपयांचा मुद्देमाल आढळून आला़गोडावूनमध्ये २ लाख ४० हजार रुपये किमतीचे विमल पान मसाल्याचे १० खोके, ६० हजार रुपयांचे मिराज तंबाखूचे १० खोके, ६० हजार रुपये किमतीचा गुटखा यासह बंदी असलेला गुटखा आणि पानमसाल्याचे डबे आढळून आले होते़ पथकाने मुद्देमाल जप्त करत दुकानमालक सुंदर दामेचा व मुद्देमाल विसरवाडी पोलीसांना सोपवला़ही कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी, पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र पाडवी, मनोज नाईक, मोहन ढमढेरे यांच्या पथकाकडून करण्यात आली़