शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

फेस गावच्या पाणी योजनेत चार लाखांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 12:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : फेस ता़ शहादा येथील ग्रामीण पाणी पुरवठा योजनेत चार लाख रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी समिती अध्यक्ष व सचिव या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े 12 वर्षापासून ही पाणी योजना प्रलंबित आह़े शासनाच्या ग्रामीण पाणी पुरवठा योजनेत फेस ग्रामपंचायतीने 12 वर्षापूर्वी सहभाग नोंदवत शहादा पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : फेस ता़ शहादा येथील ग्रामीण पाणी पुरवठा योजनेत चार लाख रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी समिती अध्यक्ष व सचिव या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े 12 वर्षापासून ही पाणी योजना प्रलंबित आह़े शासनाच्या ग्रामीण पाणी पुरवठा योजनेत फेस ग्रामपंचायतीने 12 वर्षापूर्वी सहभाग नोंदवत शहादा पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल केला होता़ ग्रामपंचायतीने गठीत केलेल्या ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीच्या अध्यक्षपदी ओंकार जगन्नाथ चौधरी यांची तर सचिवपदावर दिलीप रघुनाथ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती़ पंचायत समितीकडून समितीसाठी 4 लाख 29 हजार 931 रूपयांचा निधी जलकुंभ उभारणीसाठी देण्यात आला होता़ परंतू  अध्यक्ष आणि सचिव या दोघांनी प्रस्तावित असलेला 4 लाख 27 हजार 892 रूपयांच्या निधीचा गैरवापर केला होता़ पंचायत समितीकडून याप्रकरणी समितीचे गठन करण्यात आली होती़  चौकशी दरम्यान ओंकार चौधरी आणि  दिलीप पाटील दोघे रा़ शहादा यांना वारंवार बोलावून कागदपत्रांची मागणी करूनही त्यांनी दस्तावेज दाखल केले नव्हत़े  शहादा पंचायत समिती ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाचे उपअभियंता गुलाब जगन्नाथ मराठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ओंकार चौधरी व दिलीप पाटील यांच्याविरोधात सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आह़े फेस येथील राहुल कोळी यांनी जिल्हाअधिकारी कार्यालयासमोर 14 ऑगस्ट पासून ठिय्या आंदोलन सुरू केले होत़े प्रशासन लक्ष देत नसल्याने त्यांनी  27 ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू केले होत़े त्याची दखल घेत जिल्हाअधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होऊन गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होत़े