शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

बिबट्याने केल्या चार शेळ्या फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 13:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा येथील जुना उटावदकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या सोमसिंग रघुनाथ पाडवी व अरुण वाणी यांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : तळोदा येथील जुना उटावदकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या सोमसिंग रघुनाथ पाडवी व अरुण वाणी यांच्या शेताच्या बांधावर रविवारी दुपारी तीन वाजेदरम्यान बिबट्याने चार शेळ्या फस्त केल्याची घटना घडली. बिबट्याचे वाढते हल्ले चिंताजनक झाले असून वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.रविवारी दुपारी गोविंद अशोक पाडवी हे आपल्याकडील आठ-दहा शेळ्या घेऊन उटावद शिवारात चारण्यासाठी गेला होता. दुपारच्या सुमारास त्याने शेळ्या चरण्यासाठी सोडल्या व एका झाडाच्या आडोशाला जाऊन बसला. तीन वाजेच्या सुमारास सोमसिंग रघुनाथ पाडवी व अरुण वाणी यांच्या शेताच्या बांधावर बिबट्याने कळपावर हल्ला चढवला. त्यात चार शेळ्या फस्त केल्या. घडलेला प्रकार रखवालदार कालूसिंग बबन वळवी यांच्या लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड केल्याने बिबट्या एक शेळी बाजूच्या उसाच्या शेतात ओढून नेण्यात यशस्वी ठरला. याबाबत वनविभागाला वेळोवेळी संपर्क करण्याचा प्रयत्न करूनही संपर्क झाला नाही. या बिबट्यास तात्काळ जेरबंद करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.मागील आठवड्यात बिबट्याने याच परिसरात हातोडा रस्त्यावरील चंदनवेली परिसरात मानवी वस्तीत दर्शन दिले होते. मागील आठवडाभरापासून अमरधाम परिसरातही बिबट्या वेळोवेळी निदर्शनास आला आहे. वनविभागाने याठिकाणी पिंजरा लावलेला आहे. मात्र पिंजºयात शिकार न ठेवल्यामुळे बिबट्याने पिंजºयाकडे ढुंकूनही पाहिलेले नाही.हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात दिवसेंदिवस वाढ होत असताना वनविभाग मात्र निद्रावस्थेत आहे. घटनेनंतर कार्यवाही करण्यापेक्षा हिंस्त्र प्राणी गावाकडे येऊ नये, त्यांना जंगलातच सुरक्षितता वाटावी, अशा उपाययोजनांकडे वनविभााने दुर्लक्ष केले आहे. यामुळे उपाययोजनांसाठी वनविभाग अजून किती बळींची वाट पाहणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.