शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नवापूर, शहादा, नंदुरबारचे चार नगरसेवक अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 12:49 IST

नंदुरबार :  जात पडताळणी प्रमाणपत्राच्या कारणावरून नवापूरचे दोन तर तिसरे अपत्याचा कारणावरून शहाद्याच्या एका नगरसेवकाला जिल्हाधिका:यांनी अपात्र ठरविले आहे. ...

नंदुरबार :  जात पडताळणी प्रमाणपत्राच्या कारणावरून नवापूरचे दोन तर तिसरे अपत्याचा कारणावरून शहाद्याच्या एका नगरसेवकाला जिल्हाधिका:यांनी अपात्र ठरविले आहे. याआधीच नंदुरबारच्या एका नगरसेविकेला तिस:या अपत्यामुळे अपात्र ठरविण्यात आले आहे. नगरसेवक पदाच्या संबधीत जागा रिक्त झाल्याचेही या अध्यादेशात नमुद करण्यात आले आहे. नवापूर येथील प्रभाग क्रमांक सहा अ या ओबीसी महिला राखीव जागेवर सारिका मनोहर पाटील व प्रभाग क्रमांक सात अ या ओबीसी पुरुष राखीव जागेवरून दर्शन प्रताप पाटील हे काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले होते ते अपात्र ठरले. पराभूत उमेदवार नैन्सी राकेश मिस्त्री व अतुल तांबोळी यांनी खोटे जातप्रमाणपत्र दोघांनी सादर केल्याचा आरोप केला होता. शिवाय जात प्रमाणपत्र समितीकडे तक्रार केली होती. त्यानुसार जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने सारिका पाटील व दर्शन पाटील यांचा इतर मागासवर्ग जातीचा दाखला अमान्य केला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी दोन्ही नगरसेवकांना नुकत्याच दिलेल्या आदेशानुसार अपात्र ठरविले आहे.शहाद्यातही एकजण अपात्रतिस:या अपत्याच्या कारणावरून शहादा पालिकेतील राष्ट्रवादीच्या एकमेव नगरसेवकाचे सदस्यपद रद्द झाल्याने विद्यमान पालिकेतील राष्ट्रवादीचे अस्तित्व संपुष्टात आले.डिसेंबर 2016 मध्ये झालेल्या पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 7-ब मधून शेख इकबाल शेख सलीम हे राष्ट्रवादीचे एकमेव नगरसेवक निवडून आले होते. शेख यांनी काँग्रेसचे राकेश पाटील यांचा पराभव केला होता. निवडणुकीनंतर शेख यांना तिसरे अपत्य झाल्याने काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक मकरंद पाटील यांनी शेख यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी जिल्हाधिका:यांकडे केली होती. मकरंद पाटील यांच्या तक्रारीवरुन जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी वेळोवेळी सुनावणी घेऊन चौकशीअंती महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 16 व 44 प्रमाणे शेख इकबाक शेख सलीम यांना दोनपेक्षा जास्त अपत्य असल्यामुळे त्यांना अपात्र घोषित करुन प्रभाग क्रमांक 7-ब चे सदस्यपद रिक्त असल्याचा निर्णय दिला.नंदुरबारातही एक जण अपात्रनंदुरबारात देखील यापूर्वी एका महिला सदस्याला तिस:या अपत्याप्रकरणी अपात्र घोषीत करण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक 10 मधील कल्याणी अजरून मराठे  यांना तिसरे अपत्य असल्याबाबत विठ्ठल चौधरी यांनी हरकत घेतली होती. त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी होऊन जिल्हाधिका:यांनी कल्याणी मराठे या शिवसेनेच्या नगरसेविकेस अपात्र ठरविले होते. जिल्ह्यात गेल्या तीन महिन्याच्या कालावधीत तिसरे अपत्यामुळे दोन तर जातीच्या दाखल्याच्या हरकतीवरून दोन असे एकुण चार नगरसेवक अपात्र ठरविण्यात आले आहे. आता निवडणूक विभागातर्फे या जागांवर कधी निवडणूक घेतली जाते याकडे आता लक्ष लागून आहे.