लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आयफोनच्या आमिषाला बळी पडत तिघांनी अडीच लाख गमाविल्याचा प्रकार नंदुरबारात घडला. याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात उज्जैन येथील चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांनुसार, नंदुरबारातील बोहरी मशीदजवळ राहणारा व हार्डवेअर दुकान असलेला अली अजगर हकीमुद्दीन मर्चंट यांचा मुलगा व त्याचे दोन मित्र यांना इन्स्टाग्रामवर आयफोन स्वस्तात उपलब्ध करून देण्याची जाहिरात दिसली. त्यावर त्यांनी संपर्क साधला असता कुसई बुऱ्हानोद्दीन नरसिंगवाला, बुऱ्हानोद्दीन नरसिंघवाला, तसनिम बुऱ्हानोद्दीन नरसिंघवाला, जनबुद्दीन चंदाभाईवाला, रा. उज्जैन यांनी त्यांना बँक खाते नंबर व फोन पे चा क्रमांक देऊन वेळोवेळी पैसे पाठविण्यास सांगितले. त्यानुसार तिघांनी एकूण दोन लाख ४४ हजार रुपये त्यांनी पाठिवले. परंतु उज्जैन येथील चौघांनी ना आयफोन पाठविले ना त्यांच्या कॅालला उत्तर दिले.त्यामुळे आपण फसविलो गेल्याचे लक्षात आल्याने मुलांनी वडिलांना सांगितले. त्यानुसार अली अजगर हकीमुद्दीन मर्चंट यांनी फिर्याद दिल्याने चौघांविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक आर. व्ही. कळमकर करीत आहेत.
आयफोनला भुलले अडीच लाख गमावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 12:32 IST