शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
3
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
4
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
5
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
6
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
7
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
8
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
10
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
11
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
12
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
13
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
14
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
15
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
16
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
17
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
18
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
19
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
20
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका

वनक्षेत्रातील अतिक्रमणे काढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 12:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : तालुक्यातील खेकडा वनक्षेत्रात नव्याने केलेले दोघांचे अतिक्रमण वनविभागाकडून काढण्यात आले. संबंधितांना नोटिसा देण्यात आल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : तालुक्यातील खेकडा वनक्षेत्रात नव्याने केलेले दोघांचे अतिक्रमण वनविभागाकडून काढण्यात आले. संबंधितांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.सहायक वनसंरक्षक नंदुरबार वनविभाग शहादा यांच्या आदेशाने वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे, चिंचपाडा येथील वनक्षेत्रपाल आर.बी. पवार यांच्यासह नवापूर व चिंचपाडा येथील कर्मचारी यांनी गायमुख परिसरात परिमंडळ खेकडामधील नियतक्षेत्र कारेघाट राखीव वनखंड क्रमांक-४३ मध्ये नव्याने साफसफाई करुन घरबांधणी करुन कैलास रतिलाल गावीत रा.खेकडा यांनी केलेले अतिक्रमण काढले.वनविभागाची विहीत कोणतीही परवानगी न घेता वनकायदा तरतुदीचा भंग करणाऱ्या कैलास रतिलाल गावीत रा.खेकडा ता.नवापूर यांचेविरोधात खेकडा येथील वनपाल प्रकाश मावची यांनी वनगुन्हा क्रमांक- ०६/२०१९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. अतिक्रमण धारकास घरबांधणी अतिक्रमण काढून टाकण्यासाठी तीन नोटिसा देण्यात आल्या होत्या. खेकडा याच राखीव वनक्षेत्रात प्रलंबित दावा असलेले अतिक्रमणधारक रतिलाल नुत्या गावीत रा.खेकडा यांचेही अतिक्रमण क्षेत्रावरील दावा जिल्हास्तरीय समितीने नामंजूर केला असल्याने दोन्ही अतिक्रमण क्षेत्रातील अवैध घरबांधणी अतिक्रमण गॅस कटरने कापून पूर्ण घराचे अतिक्रमण वनविभागाने काढून टाकले. अतिक्रमण काढण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत संपविण्यात आली.या कार्यवाहीत सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे, नवापूरचे वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे, चिंचपाडाचे वनक्षेत्रपाल आर.बी. पवार, वनपाल प्रकाश मावची, डी.के. जाधव, दयाराम वळवी, वनपाल अशोक पावरा, नितीन पाटील, कमलेश वसावे, संतोष गायकवाड, संजय पवार, तुषार नांद्रे, ए.जी. पावरा, अशोक पावरा, ईश्वर चौधरी, माजी सैनिक रवींद्र कासे, विशाल शिरसाठ, वाहन चालक तुंगार, नवापूर व चिंचपाडा वनक्षेत्रतील वनमजूर आदींनी सहभाग घेतला.