शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

दुष्काळग्रस्तांना सवलतीत अन्नधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 18:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील सर्वच शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या अर्थात प्राधान्य कुटूंब आणि अन्नसुरक्षा योजनेअंतर्गतत असलेल्या दरात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील सर्वच शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या अर्थात प्राधान्य कुटूंब आणि अन्नसुरक्षा योजनेअंतर्गतत असलेल्या दरात धान्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जवळपास सव्वातीन लाख कुटूंबांना त्याचा लाभ मिळणार आहे. यासंदर्भातील वर्गवारी करण्याचे काम पुरवठा विभागातर्फे सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही त्यांनाही तातडीने रेशनकार्ड उपलब्ध करून देत या योजनेचा लाभ देण्यात येणार  आहे. दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील नागरिकांना विविध योजनांचा लाभ दिला जात आहे. शासनाने नुकतीच प्रती दोन हेक्टर्पयत मदत जाहीर केली आहे. शालेय विद्याथ्र्यासाठीची फी देखील माफ करण्यात आली आहे. विद्याथ्र्याना मोफत एस.टी.प्रवास पास उपलब्ध करून दिली गेली आहे. आता सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सव्वातीन लाखापेक्षा अधीक कुटूंबांना त्याचा लाभ मिळणार आहे.जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, तळोदा व नवापूर हे संपुर्ण तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. तर अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील काही महसूल मंडळांमधील गावे दुष्काळी म्हणून घोषीत करण्यात आली आहेत. या सर्व गावांमधील लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षका योजनेअंतर्गत हा लाभ दिला जाणार आहे. या निकषानुसार उत्पन्नाच्या व इष्टांकाच्या मर्यादेत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी यामध्ये त्यांच्या शिधापत्रिकांचे संगणकीकरण व शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांचे आधार सिडींग करून लवकरात लवकर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समावेश करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.दुष्काळग्रस्त भागातील ज्या नागरिकांकडे शिधापत्रिका उपलब्ध नसतील त्या नागरिकांना शासन निर्णयानुसार  व त्यांच्या वार्षिक उत्पन्नानुसार देय प्रवर्गातील शिधापत्रिकांबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. अन्नसुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्ीना पीओएस मशिनद्वारे अन्नधान्याचे वितरण करण्यात येत असून त्यानुसार पात्र लाभार्थ्ीची बायोमेट्रीक ओळख पटविल्यानंतर अन्नधान्य वितरीत केले जात आहे. त्यांच्या नोंदी एईपीडीएस प्रणालीवर उलब्ध असून पीओएस यंत्राच्या वापरामुळे पोट्रॅबिलीटीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्या सुविधेद्वारे पोट्रॅबिलिटीने पात्र शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचा लाभ घेण्याची अनुमती याद्वारे देण्यात आली आहे. यामुळे दुष्काळीस्थितीमुळे स्थलांतर केलेल्या कुटूंबांना या योजनेअंतर्गत कुठल्याही दुकानातून सवलतीच्या योजनेतील अन्नधान्य उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील अनेक कुटूंबे दुष्काळामुळे रोजगारासाठी अन्य जिल्ह्यात तसेच काही कुटूंबे गुजरात राज्यात स्थलांतरीत झाली आहेत. त्यांना याचा कसा लाभ मिळणार याबाबत मात्र संग्धिता आहे. त्यामुळे अशा कुटूंबार्पयत देखील या योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रय} झाले पाहिजे अशी मागणी होत आहे. नंदुरबार जिल्ह्यात एकुण तीन लाख 21 हजार शिधापत्रिकाधारक आहेत. त्यात अंत्योदय योजनेतील एक लाख पाच हजार 925, दारिद्रय रेषेखालील शिधापत्रिकाधारकांची संख्या एक लाख 30 हजार 971, दारिद्रय रेषेवरील शिधापत्रिकाधारकांची संख्या 81 हजार 773 अशी आहे. दुष्काळी तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांची संख्या पुढील प्रमाणे : नंदुरबार तालुका : अंत्योदय 18,742, बीपीएल 28,249, एपीएल 13,156. शहादा तालुका : अंत्योदय 22,050, बीपीएल 35,363, एपीएल 25,805. नवापूर तालुका : अंत्योदय 18,742, बीपीएल 28,449, एपीएल 13,156. तळोदा तालुका : अंत्योदय 12,149, बीपीएल 12,907, एपीएल 6,488.काही महसूल मंडळे दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात आलेल्या धडगाव तालुक्यात एकुण 27,322 शिधापत्रिकाधारक कुटूंब आहेत. तर अक्कलकुवा तालुक्यात 47,056 शिधापत्रिकाधारक कुटूंबे आहेत.