शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
6
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
7
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
8
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा

अखेर सुरु झाले अन्न व औषध प्रशासन कार्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 12:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हानिर्मितीच्या 21 व्या वर्षात अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयाचे उद्घाटन अखेर शुक्रवारी करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हानिर्मितीच्या 21 व्या वर्षात अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयाचे उद्घाटन अखेर शुक्रवारी करण्यात आल़े शासनाने फेब्रुवारी महिन्यात नंदुरबार जिल्ह्यासाठी स्वतंत्र कार्यालय सुरु करण्याच्या घोषणेनंतर हे कार्यालय सुरु झाले आह़े राज्य शासनाच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या धुळे येथील सहायक आयुक्त कार्यालयाकडून आजवर नंदुरबार जिल्ह्याचा कारभार सांभाळला जात होता़ येथे स्वतंत्र कार्यालय निर्मिती व्हावी अशी मागणी औषधविक्रेते, हॉटेल व्यावसायिक आणि खाद्यपदार्थ विक्रेते यांची होती़ त्यांना कामकाजासाठी धुळे येथे जावे लागत असल्याने त्यांनी पाठपुरावा सुरु ठेवला होता़ दरम्यान गेल्या वर्षी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ़ एम़ कलशेट्टी यांनी कार्यालय सुरु करण्याच्या सूचना दिल्या होत्या़ त्यानुसार अन्न निरीक्षक म्हणून अधिकारी नियुक्त करत जिल्हाधिकारी कार्यालयात कामकाज सुरु होत़े परंतू फेब्रुवारी महिन्यात शासनाने नंदुरबार कार्यालय पूर्णपणे वेगळे सहायक आयुक्त दर्जाच्या दोन अधिका:यांची पदे निर्माण केली आहेत़ दरम्यान माहिती देताना सहआयुक्त साळूंखे यांनी सांगितले की, अन्न आणि औषध या दोन्ही स्वतंत्र विभागाचा कार्यभार सहायक    आयुक्त दर्जाच्या अधिका:यांवर सोपवण्यात येणार आह़े शासनस्तरावरुन लवकर त्यांची नियुक्ती होणार आह़े याठिकाणी निरीक्षक दर्जाचे दोघे अधिकारी कायमस्वरुपी नियुक्त आहेत़ तूर्तास सहायक आयुक्त म्हणून लक्ष्मण दराडे यांच्याकडे नंदुरबारचाही पदभार सोपवण्यात आला आह़े सोबत जळगावचे सहायक आयुक्त (औषधी) व्ही़टी़जाधव हेही काम पाहणार आहेत़ जिल्ह्यात    अवैैध गुटख्यासह बोगस मावा विक्रीबाबत प्रशासन सजग राहून कारवाई करणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितल़े 

शुक्रवारी अन्न व औषध प्रशासनाचे नाशिक विभागाचे सहआयुक्त सी.डी. साळुंखे यांच्याहस्ते नंदुरबार कृषी उत्पन्न बाजाराशेजारील दूधसंघाच्या इमारतीतील नूतन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आल़े यावेळी सहायक आयुक्त बी.डी.मोरे, सहायक आयुक्त लक्ष्मण दराडे, औषध निरीक्षक एस.एन.साळे, अन्ननिरीक्षक दिनेश तांबोळी उपस्थित होत़े . यावेळी केमिस्ट असोसिएशन, मिरची व्यावसायिक असोएिशन, हॉटेल व्यावसायिक असोसिएशनचे पदाधिकारी यांनी उपस्थिती दिली होती़ कार्यालयाचे उद्घाटन झाल्याचे समाधान त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आल़े