लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पुसनद ता़ शहादा येथील महिलेचा वर्षभरापासून सातत्याने पाठलाग करुन विनयभंग करणा:या सारंगखेडा पोलीसांनी ताब्यात घेतल़े दरम्यान महिलेला संशयिताच्या कुटूंबियांनी मारहाणही केली होती़ पुसनद येथील हिरामण भिमराव कोळी हा गावातील 32 वर्षीय महिलेचा वर्षभरापासून पाठलाग करत होता़ ही बाब पिडित महिलेने हिरामण कोळी याच्या लहान भावास पत्नीस सांगितली होती़ याचा राग आल्याने संशयिताची आई विमलबाई, पत्नी संगिताबाई आणि बहिण मंगलाबाई यांनी पिडितेस घरासमोर जावून शिवीगाळ करुन मारहाण केली होती़ घटनेनंतर पिडित महिलेने सारंगखेडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन हिरामण कोळीसह तिघा महिलांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास पाटील करत आहेत़ याप्रकरणी सारंगखेडा पोलीसांनी संशयित हिरामण यास ताब्यात घेतले आह़े त्याला न्यायालयात हजर करण्यात येऊन न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यात आली़
महिलेचा पाठलाग करुन विनयभंग करणा:यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 21:32 IST