शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

नवीन पोलीस ठाणे प्रस्तावासाठी पाठपुरावा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:36 IST

शहादा पोलीस ठाण्यांतर्गत येणारा भाग आणि शहादा शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता या ठिकाणी नवीन एक पोलीस ठाणे हवे, ...

शहादा पोलीस ठाण्यांतर्गत येणारा भाग आणि शहादा शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता या ठिकाणी नवीन एक पोलीस ठाणे हवे, यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे पाठपुरावा सुरू आहे. त्यासाठी प्रस्तावही वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यात आलेला आहे. वाढती लोकसंख्या आणि इतर बाबी लक्षात घेता त्या पोलीस ठाण्यावर कामाचा ताण पडत आहे. त्यामुळे नवीन पोलीस ठाणे लवकरात लवकर व्हावे, यासाठी मागणी व पाठपुरावा सुरू असल्याचे महेंद्र पंडित यांनी सांगितले. नवीन पोलीस ठाण्यासाठी किमान ९० पोलीस कर्मचारी आणि इतर अधिकारी असे मिळून जवळपास १०० पेक्षा अधिक जणांची गरज असते. त्यासाठी पदनिर्मिती आणि इतर बाबींसाठी अनेक प्रक्रियांमधून जावे लागते. जर आहे त्या मनुष्यबळात पोलीस ठाणे सुरू करावयाचे असेल तर त्यालाही परवानगी दिली जाते; परंतु जिल्हा पोलीस दलात आधीच रिक्त जागा आहेत. आहे त्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण आहे. त्यामुळे नवीन पदनिर्मिती करूनच शहादा ग्रामीण पोलीस ठाणे सुरू करावे, यासाठी प्रयत्न राहणार आहे. शहादा ग्रामीण पोलीस ठाण्यासाठी महसूल विभागाकडून एक एकर जागादेखील मंजूर करून घेतली आहे.

याशिवाय नंदुरबार उपनगर पोलीस ठाणे आणि नंदुरबार शहर पोलीस ठाण्यासाठीदेखील नवीन व स्वतंत्र इमारत व्हावी, यासाठी प्रयत्न व पाठपुरावा सुरू आहे. उपनगर पोलीस ठाण्याचे कामकाज पालिकेच्या सामाजिक सभागृहात सुरू आहे, तर शहर पोलीस ठाणे महसूल विभागाच्या इमारतीमध्ये आहे. त्यांना स्वतंत्र इमारत व्हावी यासाठी मागणी असल्याचेही पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्पष्ट केले.