बिया वेचणे सुरू
नंदुरबार : शहरातील मिरची पथारींवरची मिरची संपून मैदाने रिकामी झाली आहेत. या मैदानांवर सकाळच्या वेळेत महिला व पुरुष मजूर बिया वेचताना दिसून येत आहेत. बिया वेचून त्यांची चांगल्या दराने विक्री होत असल्याने अनेक जण त्या गोळा करतात.
रस्ता दुरुस्ती
नंदुरबार : शहरातून प्रकाशाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. यातून करण चाैफुली ते पातोंडा गाव व पुढे रस्ता दुरुस्ती करण्यात आली आहे. यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला असून खड्ड्यांपासून मुक्ती मिळाली आहे.
नागरिक त्रस्त
नंदुरबार : लाॅकडाऊन सुरू असल्याने सायंकाळी सातनंतर रहिवासी वसाहतींमध्ये शुकशुकाट होत आहे. यातून माेकाट श्वानांच्या झुंडी फिरत असून भीती निर्माण होत आहे. शहरालगतच्या वसाहतींमध्ये मोकाट श्वानांची सर्वाधिक भीती आहे.
कैऱ्या लगडल्या
नंदुरबार : जिल्ह्यात आंब्याची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. सध्या आंब्याच्या झाडांना कैऱ्या लगडलेल्या दिसून येत आहेत. लोणच्यासाठी सातपुड्यातील गावरानी कैरीला मोठी मागणी असते.