शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचे वॉटर ऑडीटसाठी आता फ्लो वॉटर मिटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 16:50 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार पालिकेला पाणी पुरवठा करणा:या विरचक प्रकल्पातील दोन्ही मुख्य जलवाहिनींवर वॉटर फ्लो मिटर बसविण्यात ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार पालिकेला पाणी पुरवठा करणा:या विरचक प्रकल्पातील दोन्ही मुख्य जलवाहिनींवर वॉटर फ्लो मिटर बसविण्यात येत आहे. यामुळे धरणातील किती पाणी पालिका घेते, प्रत्यक्षात किती पाणीपुरवठा होतो याची नोंद ठेवली जाणार आहे. या कामाला गुरुवारी सुरुवात करण्यात आली. यामुळे शहराचा पाणी पुरवठा दोन दिवस बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान, शहराचे लवकरच वॉटर ऑडीट केले जाणार असून त्यानंतर सध्याच्या उन्हाळ्यात पाणी पुरवठा किती काळ करावा याचा निर्णय घेतला जाणार आहे.नंदुरबार शहराला शिवण नदीवरील विरचक प्रकल्पातून मुख्यत: पाणी पुरवठा केला जातो. याशिवाय 25 ते 30 टक्के भागात आंबेबारा धरणातील पाण्याचा आष्टे पंपींग स्टेशनमधून उपसा करण्यात येतो. शासनाच्या आदेशानुसार आता ज्या धरणातून, प्रकल्पातून किंवा विहिरीतून पाणी घ्यावयाचे असेल तर त्यासाठी वॉटर फ्लो मिटर बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार पालिकेने विरचक प्रकल्पातील दोन पाईपलाईनवर अशा प्रकारचे वॉटर मिटर बसविण्यास सुरुवात केली आहे.500 मि.मी.जलवाहिन्याविरचक प्रकल्पात असलेल्या इंटकवेल मधून पाणी उपसा करण्यासाठी 500 मि.मी.च्या दोन जलवाहिन्या आहेत. त्यातील पाणी तेथेच असलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पात टाकले जाते. या दोन्ही जलवाहिन्यांवर 450 मि.मी. आकाराच्या पाईपमध्ये हे वॉटर फ्लो मिटर बसविण्यात येत आहे. गुरुवारी सकाळी 10 वाजता या कामाला सुरुवात करण्यात आली. पाणी पुरवठा विभागाचे सभापती कैलास पाटील यांच्यासह अभियंता व सर्व कर्मचारी या ठिकाणी दिवसभर ठाण मांडून होते. गुरुवारी सायंकाळर्पयत 70 टक्के काम पुर्ण करण्यात आले होते. मध्यरात्रीर्पयत काम पुर्ण करून लागलीच पाणी पंपींग करण्यास सुरवात होण्याची शक्यता आहे. जर काही तांत्रिक अडचणी आल्या नाहीच तर शुक्रवार, 25 रोजी दुपार्पयत काही भागातील पाणी पुरवठा सुरू करण्याचे नियोजन पाणी पुरवठा विभागाने करून ठेवले आहे. अंदाजे मोजमापआतार्पयत अंदाजे पाण्याचे मोजमाप केले जात होते. पाणी उपसा करणा:या विद्युत मोटारींची क्षमता, त्या किती तास चालल्या त्यावरून पाणी उपसाचा अंदाज काढला जात होता. तो अंदाज अचूक राहत नव्हता. त्यामुळे वॉटर ऑडीट करतांना किंवा धरणातील किती पाणीसाठा  उचलला हे जाणून घेण्यासाठी   अंदाजे आकडेवारी समोर आणावी लागत होती. आता वॉटर फ्लो मिटरमुळे ती आकडेवारी अचूक मिळणार आहे. पाणीसाठा आरक्षीतशहराला पाणी पुरवठासाठी विरचक प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरला तर 50 टक्के पाणीसाठा हा पालिका आरक्षीत करतो. जर 60 टक्केपेक्षा कमी पाणीसाठा झाला तर संपर्ण पाणीसाठा आरक्षीत केला जात असतो. यंदा तर केवळ 41 टक्केच पाणीसाठा झाल्याने संपुर्ण पाणीसाठा पालिकेने आरक्षीत केला आहे. अशीच स्थिती आंबेबारा धरणातील आहे. तेथील पाणीसाठा देखील पालिकेने आरक्षीत करून घेतला आहे. त्यामुळे दुष्काळी    स्थिती असूनही यंदा शहरवासीयांना पाणी टंचाईच्या स्थितीला फारसे सामोरे जावे लागणार नसल्याचे चित्र आहे.