शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

अपघातातील मृतांवर अंत्यसंस्कारामुळे शहाद्यातील अमरधाममध्ये अश्रूंचा महापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 12:51 IST

सुनील सोमवंशी ।  लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : रविवार, 18 ऑगस्ट 2019 शहाद्याच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून या दिवसाची ...

सुनील सोमवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : रविवार, 18 ऑगस्ट 2019 शहाद्याच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून या दिवसाची नोंद इतिहासात होईल.. शिंदखेडा तालुक्यातील निमगूळ गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात शहाद्यातील एक-दोन नव्हे तर तब्बल आठ प्रवाशांचा करुण अंत झाला.दरवर्षी रिमङिामणा:या पावसात सण-उत्सव साजरा होणा:या ऑगस्ट महिन्याने यंदा मात्र शहादेकरांवर दु:खाची संक्रांत आणली. गेल्याच पंधरवडय़ात संततधार पावसाने तालुक्याला अक्षरश: झोडपून काढले. पावसाच्या पुराने संपूर्ण तालुका होरपळला गेला. अनेक घरांमध्ये  पाणी घुसल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. शेतात पाणी घुसल्याने उभ्या पिकांचे नुकसान झाले. या पुराने तीन-चार बळी घेतले. सुमारे 40 जनावरे दगावली. शहाद्याच्या या आपत्तीचे निवारण होत नाही तोच रविवारची ही मोठी दुर्घटना घडल्याने शहादेकरांवर लागोपाठ झालेल्या या दुस:या आघाताने संपूर्ण तालुका सुन्न झाला आहे.नेहमीची शहादा आगाराची औरंगाबाद-शहादा ही बस शहाद्याकडे येत असताना निमगूळ गावाजवळ बसला समोरुन येणा:या कंटेनरने जोरदार धडक दिली. काही वेळातच आपण शहाद्याला पोहोचू आणि आपला प्रवास संपेल असे स्वप्न बाळगून शहाद्याकडे निघालेल्या या प्रवाशांचा निमगूळ गावाजवळच अवघ्या संपूर्ण जीवनाचाच प्रवास संपल्याची घटना घडली. बसचालकासह शहादा येथील तब्बल   आठ प्रवासी या अपघातात दगावल्याने शहादेकरांवर दु:खाची काळी छाया पसरली आहे. एकाच कुटुंबातील आई आणि मुलगा, काकू आणि पुतण्या यांचा समावेश आहे. प्रेरणा श्रीराम वंजारी व त्यांचा मुलगा सौरभ श्रीराम वंजारी हे दोघेही अपघातात ठार झाले. सौरभ हा येथील शेठ व्ही.के. शहा विद्यालयातील नववीचा विद्यार्थी होता. शाळेतील चुणचुणीत असा विद्यार्थी वर्गाचा मॉनीटर होता. व्हालंटरी शाळेच्या विद्यार्थीप्रिय शिक्षिका वृषाली दीपक भावसार व त्यांचा आठवीतील पुतण्या तेजस जगदीश भावसार या एकाच कुटुंबातील दोघेही या अपघातात दगावले. शहाद्यातील केळीचे  व्यापारी शकील महंमद बागवान, एस.टी.  बसचालक मुकेश नगीन पाटील, शिरुड दिगरचे संजय ताराचंद अलकरी, शहाद्यातील व्यापारी सुयोग बन्सीलाल नहाटा यांचेही या अपघातात दुर्दैवी निधन झाले.अपघातात दगावलेल्या सर्वावर शहादा अमरधाममध्ये अंत्यविधी करण्यात आला. अंत्यविधीसाठी अक्षरश: नंबर लावावे लागले. मृतांचे नातेवाईक आणि शहादेकर शोकाकूल नागरिकांनी अमरधामकडे धाव घेतल्याने एवढे प्रशस्त अमरधामही आज लोकांच्या उपस्थितीने हाऊसफुल्ल झाले होते. संपूर्ण शहरावर शोककळा पसरल्याने अमरधाममध्ये पाय ठेवायलाही जागा नव्हती. अंत्यसंस्कारासाठी शोकाकूल कुटुंबीयांना प्रतीक्षा करावी लागली. अमरधाममधील हे दृष्य सर्वाच्याच डोळ्यात पाणी आणणारे होते. शहाद्याच्या इतिहासात हा दिवस काळा दिवस म्हणूनच ओळखला जाईल.