मिशन शाळा, मलोणी
शहादा तालुक्यातील मलोणी येथील एस.ए. मिशन खासगी प्राथमिक शाळेत आनंद पटेल यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक एस. पी. नाथानी, मुख्याध्यापक प्रल्हाद राजभोज, वसतिगृह व्यवस्थापक नरेंद्र वसावे, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांनी देशभक्ती गीते सादर केली. अर्चना चर्वतूर यांनी तंबाखूमुक्त अभियानांतर्गत उपस्थितांना शपथ दिली. विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन चित्रकला व गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सूत्रसंचालन कुणाल सोमवंशी यांनी तर आभार सोनाली पाकळे यांनी मानले. कार्यक्रमासाठी उषा जाधव, मंगला पाटील, भारती शेवाळे, रविकांता वसावे, नितीन गलराह, संजय अहिरे, शेख, मृणालिनी भोई, श्वेता गलराह, नीलिमा पटेल, अमित पटेल, बेंजामिन वळवी, मनीष सुतार, अजय गोडबोले आदींनी परिश्रम घेतले.
ग्रामपंचायत म्हसावद
शहादा तालुक्यातील म्हसावद येथील ग्रामपंचायतीत सरपंच अक्काबाई ठाकरे यांच्या हस्ते, जि. प. मराठी मुलींची शाळा म्हसावद येथे ग्रा. पं. सदस्य मुकुंद अहिरे, ग्रामसचिवालय म्हसावद येथे ग्रा. पं. सदस्या आशाबाई पाटील, पशुवैद्यकीय दवाखान्यात ग्रा. पं. सदस्या सुनीता पाटील, जि. प. ऊर्दू शाळेत उपसरपंच चिंतामण लांडगे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. सूत्रसंचालन मुख्याध्यापक रवींद्र बैसाणे यांनी केले. यावेळी सिंधूबाई शेमळे, प्रकाश पाटील, अनिल पाटील, मदन पावरा, भगवान पाटील, ग्रामविकास अधिकारी बी. पी. गिरासे, तलाठी लक्ष्मण कोळी, केंद्रप्रमुख पी. आय. चव्हाण, केंद्र मुख्याध्यापिका पुष्पा बाविस्कर ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.
वल्लभ विद्यामंदिर, पाडळदा
शहादा तालुक्यातील पाडळदा येथील वल्लभ विद्यामंदिरात संस्थेचे चेअरमन रमेश शंकर चौधरी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. मुख्याध्यापक विजय पाटील यांच्या हस्ते स्काऊट ध्वजवंदन करण्यात आले. विविध कार्यकारी सहकारी सोसायटीत संचालक यशवंत भिक्कन पाटील व ग्रामपंचायतीत सरपंच मुलकनबाई ठाकरे यांनी ध्वजवंदन केले. कार्यक्रमास संस्थेचे व्हा. चेअरमन दत्तात्रय पाटील, संचालक जगन्नाथ पाटील, दीपक पाटील, संजय पाटील, वासुदेव पाटील, जगदीश पाटील, दशरथ पाटील, ईश्वर पाटील, ग्रामसेवक गवळी, तलाठी संतोष गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत सामुद्रे, आरोग्य कर्मचारी, वि. का. स. सोसायटीचे चेअरमन कुसुमाकर पाटील, संचालक मंडळ, ग्रामपंचायत कर्मचारी, आदर्श प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका सुनंदा पाटील, पर्यवेक्षक आंबालाल चौधरी, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. चतुर पाटील यांनी तंबाखूमुक्तीची शपथ सर्व उपस्थितांना दिली.
समता विद्यालय, धानोरा
नंदुरबार तालुक्यातील धानोरा येथील समता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आणि प्रियदर्शनी कन्या विद्यालयात जि.प.चे माजी सभापती विक्रमसिंग वळवी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. कार्यक्रमास डॉ. राजू मक्कन चौधरी, प्राचार्य अशोक पवार, मुख्याध्यापक दीपक माळी, पर्यवेक्षक संजय सावळे, पी. एल. पाटील, संजय सावळे, सी. बी. वळवी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन गणेश महाजन यांनी केले. कार्यक्रमासाठी शांताराम मराठे, इंदिरा पवार, प्रतिभा कुलकर्णी, सविता पटेल, सुनंदा पाटील, कल्पना नाईक, प्रेमचंद पाटील, अरुण सैंदाणे, रविकांत वसावे, किरण बेडसे, नीलेश साळुंखे, विश्वास पाडवी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
सर्वोदय विद्यामंदिर, प्रकाशा
शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील सर्वोदय विद्यामंदिरात संस्थेचे संचालक डॉ. सखाराम रतिलाल चौधरी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य ए. के. पटेल, उपमुख्याध्यापक डी. टी. चौधरी, पर्यवेक्षक चंद्रकांत पटेल शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी शालेय आवारामध्ये वृक्षारोपण करण्यात आले व व्यसनमुक्तीवर सामूहिक शपथ घेण्यात आली.