शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजार विद्याथ्र्यानी साकारले तंबाखू मुक्तीचे बोधचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 16:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील 28 शाळांमधील पाच हजार विद्याथ्र्यानी एकाच वेळी  साकारलेले ‘च्यूस लाईफ नॉट टोबॅको’चे बोधचिन्हाने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील 28 शाळांमधील पाच हजार विद्याथ्र्यानी एकाच वेळी  साकारलेले ‘च्यूस लाईफ नॉट टोबॅको’चे बोधचिन्हाने आणि तंबाखू मुक्तीची घेतलेली शपथ हा एक नवीन रेकॉर्ड प्रस्थापीत झाला. पाच हजार विद्यार्थी आणि उपस्थितीत शिक्षक, पालक व अधिका:यांना खासदार डॉ.हिना गावीत यांनी शपथ दिली. जिल्हा प्रशासन, रोटरी क्लब ऑफ नंदनगरी व सलाम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुलात शनिवारी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नंदुरबार आधीच तंबाखूमुक्त शाळांचा जिल्हा म्हणून घोषीत झाला आहे. आता शाळांव्यतिरिक्त संपुर्ण जिल्हा तंबाखुमुक्त व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याच अनुषंगाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार डॉ.विजयकुमार गावीत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक, जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, नगराध्यक्ष परवेजखान, पोलीस अधीक्षक संजय पाटील, सहायक जिल्हाधिकारी वान्मती सी., अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी एन.डी.बच्छाव, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, सिमा अहिरे, रोटरीचे अध्यक्ष शब्बीर मेमन, निलेश तवंर आदी उपस्थित होते.एवढय़ा मोठय़ा संख्येने विद्यार्थी एकत्र येत सामुहिक शपथ घेतल्याचा हा पहिलाच प्रयोग आहे. यावेळी बोलतांना खासदार डॉ.हिना गावीत यांनी सांगितले, जिल्हा व्यसनमुक्त व्हावा यासाठी जिल्हा प्रशासन आणि विविध समाजसेवी संस्थांचे प्रय} नक्कीच कौतूकास्पद आहे. निरोगी जीवनासाठी कुठल्याही प्रकारचे व्यसन करू नये. व्यसनांमुळे स्वत:चे जीवन तर उध्वस्त होतेच परंतु कुटूंब देखील उध्वस्त होते. त्यामुळे युवकांनी अशा व्यसनांपासून दूर राहावे आणि कुटूंब, समाज, देश विकासात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी सांगितले, राज्यात सर्वात जास्त तंबाखू मुक्तीचे काम जिल्ह्यात झाले आहे. यासाठी शाळेतील विद्याथ्र्याचा सहभाग मोठय़ा प्रमाणात होता. जिल्हा संपुर्णपणे व्यसनमुक्त होईल यासाठी सर्व स्वयंसेवी संस्था, महाविद्यालये, विद्यालय आणि प्रशासनाला मोठय़ा प्रमाणावर काम करावे लागणार आहे. भविष्यात ही चळवळ लोकचळवळ होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.बोधचिन्ह रेखाटन करण्यासाठी कला शिक्षक राजेंद्र ठाकरे, डी.डी.कुलकर्णी, अशोक मराठे, दिपक माळी, संतोष पाडवी, प्रकाश सोनवणे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचलन पत्रकार रणजीत राजपूत यांनी केले. आभार नवनिर्माण समाज हितार्थ संस्थेचे रवी गोसावी यांनी मानले.