शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजार क्विंटल कापूस आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 12:09 IST

 लाेकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  सीसीआयकडून   पळाशी येथील केंद्रात गुरूवारपासून कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहे. दिवाळीनिमित्त ...

 लाेकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  सीसीआयकडून   पळाशी येथील केंद्रात गुरूवारपासून कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहे. दिवाळीनिमित्त तीन दिवस बंद असल्याने या केंद्रात गुरूवारी पहिल्याच दिवशी ५ हजार क्विंटल कापूस आवक झाली.  दिवाळीमुळे बंद असलेल्या केंद्रात गुरूवारी सकाळपासून वाहनांची आवक सुरू झाली होती. एकूण ३५० वाहने दिवसभरात दाखल झाली होती. रात्री उशिरापर्यंत  केंद्रात कापूस मोजणी सुरू होती. नंदुरबार तालुक्यासह अक्कलकुवा, तळोदा आणि नवापूर तालुक्यातील नोंदणीकृत शेतक-यांनी येथे कापूस विक्रीसाठी आणला होता.  या कापसासाठी सीसीआयने ५ हजार ५००, ५ हजार ५२५, ५ हजार ६६५ व ५ हजार ७२५ असे दर निश्चित केले होते. यापूर्वी  पळाशी येथील कापूस खरेदी केंद्रात १२ हजार ४५४ क्विंटल कापूस आवक झाली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कापूस खरेदी बंद असल्याने आवक थांबली होती. दरम्यान गुरूवारी खरेदी पूर्ववत सुरू झाल्यानंतर  कापूस विक्री करताना, पीक लागवड केल्याचा सातबारा उतारा, बँक पासबुकची झेरॉक्स प्रत आणि आधार कार्डची झेरॉक्स प्रत आदी कागदपत्रे दोन प्रतीत  सोबत आणणे जरुरीचे असल्याचे कळवण्यात आले आहे. यामुळे विक्री केलेल्या कापसाचे बिल त्याच दिवशी तयार करणे  सोयीचे होणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती व सचिव यांनी दिली आहे. यंदा सीसीआयकडून कापूस खरेदी माॅईश्चर मशिन लावत मोजणी होत असल्याने ओलाव्याचा प्रश्न मार्गी निघाला आहे. शुक्रवार आणि शनिवारीही कापसाची मोठी आवक होण्याची शक्यता असून त्यादृष्टीने बाजार समितीकडून तयारी करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहेत. शहादा येथील केंद्रातही मोठ्या संख्येने वाहने आल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.