शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

नवापुरातील अतिवृष्टीत पाच जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 18:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नवापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीत पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने तीन जण तर घराची भिंत अंगावर पडून दोनजण अशा एकुण पाच जणांचा मृत्यू झाला. 27 पाळीव जनावरे देखील दगावली असून 100 पेक्षा अधीक घरांचे नुकसान झाले आहे. एक पूल आणि पाच रस्ते देखील वाहून गेले आहेत. धुळे-सुरत महामार्गावरील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नवापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीत पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने तीन जण तर घराची भिंत अंगावर पडून दोनजण अशा एकुण पाच जणांचा मृत्यू झाला. 27 पाळीव जनावरे देखील दगावली असून 100 पेक्षा अधीक घरांचे नुकसान झाले आहे. एक पूल आणि पाच रस्ते देखील वाहून गेले आहेत. धुळे-सुरत महामार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले असून, पंचनाम्यांच्या कामांना गती देण्यात आली आहे.अतिवृष्टीत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये सईदा हसन काकर (57) रा.राजीवनगर, नवापूर, जमनाबाई लाशा गावीत (65) रा. बालाहाट, नवापूर, वंतुबाई दोंदल्या गावीत (55) रा.खोकसा,  काशीराम बाबजी गावीत (50) रा. वाघळापाडा यांचा समावेश आहे. आणखी एकाचे नाव समजू शकले नाही. नवापूर तालुक्यात शुक्रवारी उत्तररात्री तीन तास मुसळधार पाऊस झाला. तीन तासात 140 मि.मी. पाऊस झाला. एकटय़ा विसरवाडी मंडळात 235 मि.मी.पाऊस झाला. यामुळे नदी, नाल्यांना पूर येवून मोठय़ा प्रमाणावर जिवीत व वित्तहाणी झाली. याशिवाय 17 म्हशी, पाच गायी, चार शेळ्या व एक घोडा असे एकुण 27 पाळीव प्राणी देखील दगावले आहेत. नवापूर शहरातील रंगावली नदी काठावरील 65 घरे भुईसपाट झाली आहेत तर इतर ठिकाणी 15 व विसरवाडी येथे 15 आणि चिंचपाडा येथे 10 घरांचे नुकसान झाले आहे.पावसामुळे व पुरामुळे चार ठिकाणचे रस्ते तर एक पूल वाहून गेला आहे. त्यामुळे दळणवळण यंत्रणा देखील ठप्प झाली आहे. धुळे-सुरत महामार्गावरील वाहतूक विसरवाडी ते दहिवेलदरम्यान ठप्प झाल्याने या मार्गावरील वाहतूक साक्री, पिंपळनेर, दहिवेल व विसरवाडी, खांडबारा, नंदुरबार, शेवाळीफाटा अशी वळविण्यात आली आहे.जिल्ह्यात गुरुवारी व शुक्रवारी पहाटे झालेल्या पावसात नवापूर व धडगाव तालुक्याला झोडपून काढले. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच दहा मंडळात 65 मि.मी.पेक्षा अधीक पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस विसरवाडी महसूल मंडळात झाला आहे. या भागात ढगफुटीचा अनुभव नागरिकांना आला. तीन तासात तब्बल 235 मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल चिंचपाडा मंडळात 192 मि.मी., नवापूर मंडळात 140 मि.मी., नवागाव मंडळात 90 तर खांडबारा मंडळात 64 मि.मी.पावसाची नोंद झाली आहे.प्रशासनाने तातडीने पंचनामे सुरू केले आहेत. उघडय़ावर आलेल्यांना तात्पुरती मदत देवून त्यांच्या निवा:याची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, प्रांताधिकारी डॉ.अर्चना पठारे यांच्यासह महसूलच्या सर्व वरिष्ठ अधिका:यांनी घटनास्थळी भेटी देवून मदतकार्याला वेग दिला आहे.