शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सायंकाळी पाच वाजेपर्यंत निकाल शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 11:50 IST

२७ फेऱ्यांचे नियोजन : व्हीव्हीपॅट आणि टपाली मतमोजणी राहणार वेगळी

नंदुरबार : लोकसभा निवडणुकीच्या निकालाची सर्वांनाच उत्सूकता लागून आहे. कोण जिंकणार याबाबत अनेकांनी पैजा देखील लावल्या आहेत. येत्या २३ तारखेला मतमोजणी होणार असून त्यासाठी प्रशासनाने तयारी पुर्ण केली आहे. साधारणत: २७ फेऱ्यांमध्ये निकाल जाहीर होणार आहे. त्यासाठी सायंकाळचे साडेचार ते पाच वाजण्याची शक्यता वर्तविली जात आहे.नंदुरबार लोकसभा मतदार संघासाठी २९ एप्रिल रोजी झालेल्या मतदानात एकुण ६८.३३ टक्के मतदान झाले आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये सरळ लढत असली तरी भाजप बंडखोर अपक्ष उमेदवार या निवडणुकीत ‘व्टिस्ट’ निर्माण करणार आहेत. त्यामुळे निकालाबाबत प्रचंड उत्सूकता लागून आहे. निकालाची तारीख जशी जवळ येत आहे तशी उत्सूकता ताणली जात आहे. निकालाबाबत अनेकांनी लाखोंच्या पैजा देखील लावल्या आहेत. एकीकडे सर्वसामान्यांना निकालाची उत्सूकता आहे तर दुसरीकडे प्रशासनाने मतमोजणीची तयारीचे नियोजन अंतिम टप्प्यात आणले आहे. लवकरात लवकर निकाल लावण्याकडे जिल्हा प्रशासनाचा कल राहणार आहे.मतदान वाढल्यानेमोजणीला लागणार वेळयंदा मतदानाची टक्केवारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. राज्यात सर्वाधिक मतदान झालेल्या लोकसभा मतदार संघापैकी नंदुरबार एक आहे. एकुण ६८.३३ टक्के मतदान झाले. अर्थात १२ लाख ७७ हजार ७९६ जणांनी मतदान केले आहे. तेव्हढ्या मतदानाची मोजणी करावी लागणार आहे. गेल्या वेळी १० लाख ९३ हजार २२१ जणांनी मतदान केले होते. यंदा एक लाख ८४ हजार ५७५ अधीक मतदान मतदान झाले आहे. गेल्यावेळी साधारणत: अडीच वाजेपर्यंत निकाल जाहीर करण्यात आला होता. यंदा मात्र वेळ लागण्याची शक्यता आहे.३० व्हीव्हीपॅटमधीलचिठ्ठयांचीही मोजणीयंदाच्या निवडणुकीपासून आपले मत कुणाला गेले हे पहाण्याची सोय अर्थात व्हीव्हीपॅटची सोय करण्यात आली होती. त्यातील चिठ्ठी सुरक्षीत अर्थात ते मशीनही सील करण्यात आलेले आहेत. यापैकी प्रत्येक विधानसभा मतदार संघातील कोणतेही पाच व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्यांचीही मोजणी करण्यात येणार आहे. अर्थात सहा मतदार संघातील ३० व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठींची मोजणी होणार आहे. एका व्हीव्हीपॅटच्या मोजणीला साधारणत: १२ ते २० मिनिटांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे सर्व व्हीव्हीपॅटची मोजणीला किमान दोन ते अडीच तासांचा वेळ लागणार आहे. त्यामुळे निकाल तेवढा लांबणीवर जाणार आहे.कर्मचारी नियुक्तीमतमोजणीसाठी कर्मचाºयांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाºयांना लवकरच प्रशिक्षण दिले जाणार आहे. साधारणत: ४०० कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात येणार आहे.एकुण ८४ टेबल राहणार आहेत. अर्थात प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचे १४ टेबल राहतील. त्या टेबलांवर एकाच वेळी मतमोजणी केली जाणार आहे.