शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

तळोद्यातील आगीत पाच घरे खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 11:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार/तळोदा : वळण रस्त्यावरील दलेलपूर रस्त्याला लागून राहणाऱ्या भरवाड पशुपालकांच्या घरांना लागलेल्या आगीत पाच घरे जळून ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार/तळोदा : वळण रस्त्यावरील दलेलपूर रस्त्याला लागून राहणाऱ्या भरवाड पशुपालकांच्या घरांना लागलेल्या आगीत पाच घरे जळून खाक झाली. कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. या आगीमुळे पाच पशुपालक कुटुंबाचे अंदाजे ८ ते १० लाखांचे नुकसान झाले आहे.तळोदा शहराबाहेरून दलेलपूरकडे जाणाºया रस्ता व खर्डी नदीला लागून सुमारे ८ ते १० भरवाड पशुपालक कुटुंब राहतात.आज दुपारी एक वाजेचा सुमारास नदीत पडलेला टाकाऊ कचरा पेटविण्यात आला होता. पेटविण्यात आलेला कचरा व पशुपालकांची घरे यातील अंतर खूपच कमी होते. दुपारच्या सुमारास हवेमुळे आगीच्या ठिणग्या पशुपालकांच्या घरावर उडाल्या व त्यामुळे घरांना आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात येत आहे. पशुपालकांच्या घराच्या छतावर व घरात कोरडा चारा असल्याने आगीने लागलीच रौद्ररूप धारण केले.या आगीत रेवा हरी भरवाड, तेजा हरी भरवाड, हमीर हरी भरवाड, रणछोड रेवा भरवाड आणि दाना रेवा भरवाड या पाच जणांची घरे पूर्णपणे जळाली. या आगीत या पाचही कुटुंबियांचे संसारउपयोगी साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. आग लागली तेव्हा घरातील प्रमुख व्यक्ती हे गुरे चाररण्यासाठी घेऊन गेले होते व दुपारची वेळ असल्याने घरातील महिला या घराबाहेरील झाडाच्या सावलीत बसल्या होत्या. मागील बाजूने धुराचे लोळ निघत असल्याचे वालाभाई भरवाड व विकास मगरे यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ घराचे दरवाजे उघडून घरात कुणी आहे का याचा शोध घेतला.या आगीत पाच कुटुंबीयांचे मोठी आर्थिक नुकसान झाले आहे. घरातील संसारोपयोगी साहित्यासह कपाटात व पेटीत ठेवलेले सुमारे ३ ते ४ तोळे सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच सर्वांचे एकत्रित सुमारे साडे चार ते पाच लाख रुपयांची रोख रक्कम देखील जळाल्याचे सांगण्यात आले. यातील एका कुटूंबाकडे मंगलकार्य होते. त्यासाठी त्यांनी घेतलेले सर्व नविन कपडे व साहित्य आगीत पूर्णपणे जळाले.दरम्यान, आग लागण्यानंतर पालिकेची अग्निशमन दलाची गाडी तब्बल अर्धा ते पाऊण तास उशिराने घटनास्थळी दाखल झाली. तोपर्यंत सर्व जळून खाक झाले होते. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर गावातील भरवाड समाजबांधवानी तसेच शहरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी मदत केली .उशिरापर्यत या घटनेची पोलिसांत नोंद करण्यात आलेली नव्हती.तेजा हरी भरवाड या पशुपालकाने शेती घेण्यासाठी दुधाचा व्यवसायातून एक एक रुपया जोडून चार लाख जमविले होते. ती रक्कम त्याने दुधाच्या कॅन मध्ये ठेवली होती. या आगीत अ‍ॅल्युमिनियमचा दुधाचा कॅन अक्षरश: वितळून गेला व त्यातील नोटा जळून राख झाल्या. या आगीमुळे तेजा भरवाड या पशुपालकांची आयुष्यभराची कमाई सोबत शेती घेण्याचे स्वप्न देखिल जळून खाक झाले आहे.