शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सात महिन्यानंतर प्रथमच तळोद्याची बाजारपेठ फुलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 16:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा :  कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात ते साडे सात महिन्यापासून बंद असलेला तळोदा शहरातील शुक्रवारचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा :  कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात ते साडे सात महिन्यापासून बंद असलेला तळोदा शहरातील शुक्रवारचा आठवडे बाजार गर्दीने फुलला होता. ग्रामीण भागातील जनतेमध्ये आठवडा बाजाराची क्रेझ आजही कायम आहे. गेल्या मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवडपासून कोरोना या वैश्विक महामारीने आपल्या देशात शिरकाव केला होता. त्याचा जास्त प्रादुर्भाव होवू नये म्हणून प्रशासनाने जास्त गर्दी होणारे आठवडे बाजार, यात्रोत्सव, धार्मिक स्थळे बंद केली होती. तळोदा पालिकेनेदेखील जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गेल्या मार्चपासूनच आपल्या क्षेत्रातील शहराचा आठवडे बाजार बंद केला होता. साहजिकच या आठवडे बाजारामुळे पालिकेच्या आर्थिक उत्पन्नात परिणाम झाला होता. गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण  जनतेमध्ये तळोदा शहरात शुक्रवारी भरणाऱ्या बाजाराचे महत्व आजही कायम आहे. कारण  ग्रामस्थ बाजारहाट, किराणा, भाजीपाला व इतर वस्तु घेण्यासाठी बाजाराच्या दिवशी येत असतात. त्यामुळे बाहेरील व्यावसायिक उलाढालपाहून मोठ्या संख्येने हजेरी लावतात. परिणामी बाजारात मोठी उलाढाल होत असते.सात महिन्यापासून बंद पडलेल्या आठवडे बाजार शुक्रवारी प्रशासनाने लाॅकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिल्यामुळे भरला होता. ग्रामीण जनतेने बाजारहाटसाठी प्रचंड गर्दी केल्यामुळे मेन रोड, स्मारक चौक, बस स्थानक परिसर, तहसील रोड गर्दीने अक्षरशः फुलले होते. नगर पालिकेने पुन्हा बाजार सुरू केल्याने काही गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले होते.याशिवाय बाहेरील भांडी, कपडे व्यावसायिक, फळ विक्रेते यांनीही हजेरी लावली होती. या वेळी गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी झाली होती.