शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

बनावट दारू निर्मितीची साखळी शोधावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 12:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील मध्यवर्ती भागात आणि नेहमीच पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे येणे-जाणे असलेल्या रस्त्याच्या शेजारी बनावट दारू ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील मध्यवर्ती भागात आणि नेहमीच पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे येणे-जाणे असलेल्या रस्त्याच्या शेजारी बनावट दारू तयार करण्याचा कारखाना गेल्या दोन वर्षांपासून सुरू होता याबाबत आता चर्चा सुरू आहे. दारू बनविणाºयाला कुणाचा आशिर्वाद होता, त्याने आणलेले साहित्य कुठले होते याचा शोध घेतला जावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.नंदुरबारातील साक्रीनाका नजीक दसेरा मैदानावर अतिक्रमीत जागेत गोडावून बांधून त्या ठिकाणी अवैध दारू निर्मितीचा कारखाना सुरू होता. शहर पोलिसांनी हा कारखाना उध्वस्त केला असून त्याला चालविणाºया एकाला अटक केली आहे. या ठिकाणी सुरू असलेला हा कारखाना गेल्या दोन वर्षापासून बिनधिक्कत सुरू असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. मध्यवर्ती भागात सुरू असलेला कारखान्याबाबत पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभाग यांना माहिती नव्हती का? माहिती असूनही दुर्लक्ष का केले गेले याबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहेत. कारखाना चालविणाºयाच्या मागे कुणाचा आशिर्वाद होता. त्याला कुणाचे पाठबळ होते. याचीही चौकशी करण्याची मागणी पुढे येत आहे. या ठिकाणाहून जप्त करण्यात आलेले साहित्य कुणाचे आहे. कुणी त्याला पुरविले असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अनेकांच्या जिवाशी खेळणारा हा प्रकार आहे.सखोल चौकशी करून बनावट दारू निर्मितीमागील साखळी शोधून काढावी, या व्यवसायातील अंतर्गत राजकारण शोधून काढावे अशी अपेक्षाही शहरवासीयांकडून व्यक्त केली जात आहे.

शहरात लॉकडाऊनमध्येही शहरातील काही ठिकाणी अवैध मद्य विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत. शहरातील आजूबाजूच्या निर्जन परिसरात बसून तळीराम दारू रिचवत आहेत. काही ठिकाणी बैठका देखील बसत आहेत. त्यामुळे पोलिसांनी अशा भागात गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.