शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

निराधार कुटुंबाला आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 12:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क म्हसावद : पुण्योक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त होणारा खर्च टाळून निराधार कुटुंबाला मदत करण्याचा निर्णय येथील ...

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसावद : पुण्योक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त होणारा खर्च टाळून निराधार कुटुंबाला मदत करण्याचा निर्णय येथील धनगर समाज बांधवांनी घेतला. अहिल्यादेवी होळकर यांनी दिलेल्या मानवतेच्या शिकवणीनुसार म्हसावद, ता.शहादा येथील धनगर समाजाने एक नवीन आदर्श उभा केला आहे.  ‘माणुसकी अजूनही जिवंत आहे’ याची प्रचिती यानिमित्ताने पहायला मिळाली.म्हसावद येथील धनगर समाज बांधव नेहमी समाज सुधारणा व मानवतावादी कामांसाठी उपक्रम राबवतात. 13 मे रोजी गावातील साधारण परिस्थिती असलेले संजय माधव धनगर (50) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. संजय धनगर यांच्या पश्चात प}ी व चार मुली आहेत. पैकी एका मुलीचा विवाह झाला आहे. त्यांचा अचानक मृत्यू झाल्याने परिवाराचा मोठा आधारच हरवला. या जाणीवेने समाजात सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती. अशा परिस्थितीत समाजातील तरुणांनी वरिष्ठांशी चर्चा करून पुण्योक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीवर यंदा होणारा खर्च गोळा करून मुलींच्या भविष्याकरिता  सुरक्षित करण्याचे नियोजन केले.  तसा संदेश व्हाट्सअप ग्रुपवर टाकण्यात आला. या संदेशाला प्रतिसाद देत समाजातील  लोकांनी मनाचा उदारपणा दाखवित 50 हजार रूपयांचा मदत निधी  गोळा केला. यापैकी काही  निधी संजय धनगर यांच्या दशक्रिया व उत्तरक्रिया विधीसाठी रोखीने देण्यात आला आणि तीन अविवाहित मुलींच्या नावे प्रत्येकी 15 हजार रुपये दुप्पट लाभाच्या योजनेत गुंतवण्यात आले. समाजाच्या या बांधिलकीने या परिवाराचे अश्रू अनावर झाले. या वेळी धनगर समाज बांधव उपस्थित होते.