शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर कोलवीमाळला पोहोचली वीज : अक्कलकुव्यापासून अवघे 13 किलोमीटर अंतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 12:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातपुडय़ाच्या दुर्गम भागातील कोलवीमाळ या गावात 25 वर्षानंतर वीजेचा प्रकाश पोहोचला आहे. अक्कलकुवा शहरापासून अवघ्या 13 किलोमीटर अंतरावरील कोलवीमाळ येथे वीज कंपनीकडून वीज वाहिण्या जोडण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर गाव प्रकाशात उजळून निघाले. 25 वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रश्नासाठी ग्रामस्थ व भिल्लिस्थान टाईगर सेना यांच्याकडून प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातपुडय़ाच्या दुर्गम भागातील कोलवीमाळ या गावात 25 वर्षानंतर वीजेचा प्रकाश पोहोचला आहे. अक्कलकुवा शहरापासून अवघ्या 13 किलोमीटर अंतरावरील कोलवीमाळ येथे वीज कंपनीकडून वीज वाहिण्या जोडण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर गाव प्रकाशात उजळून निघाले. 25 वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रश्नासाठी ग्रामस्थ व भिल्लिस्थान टाईगर सेना यांच्याकडून प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. सातपुडय़ातील विविध गावांमध्ये विजेचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. भौगोलिक दृष्टय़ा उंच सखल भागातील गाव पाडय़ांना वीज देण्यासाठी वीज कंपनीकडे योग्य ते साहित्य नसल्याने अनेक गावांना आजवर वीज मिळू शकली नाही. याबाबत तालुक्यातील कोलवीमाळ येथील नागरिकांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला भिलीस्थान टाईगर सेनेचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र पाडवी, नंदुरबार युवा जिल्हाध्यक्ष अजय गावीत व तालुकाध्यक्ष रुपसिंग वसावे यांनी प्रतिसाद देत रास्ता रोको आंदोलन केले होते. या वेळी उपस्थित ग्रामस्थांना वीज वितरण कंपनीकडून वीज देण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार आठ महिन्यांपासून सातपुडय़ातील डोंगर आणि वनक्षेत्रात उच्च क्षमतेच्या वीज वाहिनी व उंच मनोरे उभारण्याचे काम सुरू होते. हे काम नुकतेच पूर्णत्वास येवून कोलवीमाळ गावात वीज पोहोचली आहे. गेल्या 25 वषार्पासून अंधारात असलेले गाव प्रकाशमय झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे या गावात आदिवासीचे श्रद्धास्थान असलेल्या याहा  मोगी मातेची यात्रा गेल्या अनेक वर्षापासून भरवली जात आहे.  या यात्रेत हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे गावात वीज अपेक्षित होती. परंतु याकडे लोकप्रतिनिधींनीदेखील दुर्लक्ष केल्याने अखेर भिल्लीस्थान टायगर सेनेच्या माध्यमातून ग्रामस्थांना न्याय मिळाल्याने  12 फेब्रुवारी 2018 रोजी रूपसिंग टी. वसावे, गुलाबसिंग वसावे, सरपंच कौशल्या गुमानसिंग तडवी, महावितरणचे अधिकारी, कर्मचारी, सदस्य व विजा पुंजारा यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. यावेळी उमेश तडवी, अविनाश वळ्वी सुनील वसावे यासह ग्रामस्थ उपस्थित