अक्कलकुवा येथे एकावर कारवाई
नंदुरबार : अक्कलकुवा शहरातील मोलगी चाैफुली परिसरात (एमएच १७ जीए १८०६) हे वाहन उभे करत वाहतुकीस अडथळा केल्याचा प्रकार मंगळवारी दिसून आला होता. याप्रकरणी पोलीस काॅन्स्टेबल गुलाब जोहरी यांच्या फिर्यादीवरून चालक जलसिंग बिजली राऊत याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरधाव वेगात वाहन चालवल्याने गुन्हा
नंदुरबार : अक्कलकुवा शहरात बसस्थानक परिसरात एमएच १६ बीबी ३४४ हे वाहन भरधाव वेगात चालवून नियमांचा भंग करणाऱ्या सरफराज युनिस मक्राणी याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्याच्याविरोधात पोलीस काॅन्स्टेबल गुलाब जोहरी यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मोलगी येथे आठ जणांवर कारवाई
नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथे मास्क लावता फिरणाऱ्या आठ जणांवर मंगळवारी कारवाई करण्यात आली. महेंद्र प्रतापसिंग पाडवी, बहादूसिंग नटवरसिंग पाडवी, शेरसिंग केसरसिंग पाडवी, धर्मा फोज्या वसावे, रतनसिंग दाैल्या वसावे, विठ्ठल सोग्या वसावे यांच्यावर ही कारवाई झाली.