शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

सारंगखेड्यात पर्यटनाचा ‘सण्डे फिवर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 12:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : सारंगखेडा येथील यात्रोत्सवात दिवसेंदिवस रंगत वाढत असून, रविवारी प्रचंड गर्दी दिसून आली. यामुळे लहान ...

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : सारंगखेडा येथील यात्रोत्सवात दिवसेंदिवस रंगत वाढत असून, रविवारी प्रचंड गर्दी दिसून आली. यामुळे लहान मोठ्या व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.११ डिसेंबरपासून एकमुखी दत्ताच्या यात्रोत्सवाला सुरूवात झाली असून, जस जसे दिवस वाढत आहेत तस तसा सारंगखेडा यात्रोत्सव व चेतक फेस्टीवलची धूमही वाढत आहे. रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने झुले, भांडीबाजार, घोडे बाजार व खाद्य पदार्थ विक्रेते, मसाला विक्रेते व शीतपेय विक्रेत्यांकडे मोठ्या प्रमाणात भाविक खरेदी व खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतांना दिसून आले.शनिवारपासून चेतक महोत्सवाची रंगत वाढायला सुरूवात झाली. त्यातच रविवारी सुट्टी असल्याने यात्रोत्सवात गर्दीचा महापूर आल्याचे दिसून येत होते. या गर्दीमुळे विक्रेत्यांच्या चेहºयावर आनंद दिसून येत होता. सारंगखेडा यात्रा ही व्यावसायकांसाठी वर्षभरातील यात्रेचे लक्ष पूर्ण करणारी यात्रा आहे. येथील दत्त महाराजांच्या या यात्रोत्सवात प्रथम प्रभूदत्ताला विशेष मान आहे. यानंतर घोड्यांच्या बाजाराला ऐतिहासीक महत्व असून, याला चेतक फेस्टीवलची जोड लाभली आहे. त्यामुळे हा यात्रोत्सव महिनाभर रोजगार निर्मितीचा फेस्टीवल बनला आहे. सारंगखेडा हे गाव या फेस्टीवलमुळे जगाच्या नकाशावर पोहोचले आहे.चेतक फेस्टीवलचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांनी चेतक महोत्सवात अनेक कार्यक्रमांची मेजवानी ठेवली आहे. अहिराणी शो, लावणी शो, अश्व रांगाळी स्पर्धा, कॉमेडी शो, छोटा भीम, अश्व प्रदर्शन, जिल्हा परिषद शालेय नृत्य स्पर्धा, अश्व काठीयावाडी स्पर्धा, सारंग श्री शरीर सौष्ठव स्पर्धा, अश्व मारवाडी स्पर्धा, एकल नृत्य स्पर्धा, अश्व दौड अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी चेतक फेस्टीवलमध्ये आहे.४घोडे बाजारात दिवसेंदिवस रंगत वाढत असून, घोडे बाजरात रविवारी ७५ घोड्यांची विक्री झाली असून, यातून ३३ लाख दोन हजार रूपयांची उलाढाल झाली आहे. तसेच आज अखेर दोन हजार ४०० घोड्यांची आवक मधून ३९२ घोड्यांची आज अखेर विक्री झाली आहे. यातून एक कोटी ४२ लाख २६ हजार ४०० रूपयांची उलाढाल झाली आहे. अर्थात सारंगखेडा येथील घोडे बाजाराने पाच दिवसात दीड कोटींचा टप्पा पार केला.४रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने अगदी शहादा रोड ते टाकरखेड्यापर्यंतच्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या वेळी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना चांगलीच वाहतूक सुरळीत करण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली. मात्र व्यावसायिकांना आज अपेक्षेप्रमाणे फळ मिळाल्याने त्यांच्या चेहºयावर समाधानाचे चित्र दिसून आले.