शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

आवगे-जुनवणे शिवारात बिबट्याच्या संचाराने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 18:47 IST

शहादा : तालुक्यातील आवगे जुनवणे शिवारात दोन दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार झाल्याची घटना घडली़ घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भिती पसरली ...

शहादा : तालुक्यातील आवगे जुनवणे शिवारात दोन दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार झाल्याची घटना घडली़ घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भिती पसरली असून शेतशिवारात काहींना बिबट्या दिसून आल्याची माहिती आहे़आवगे-जुनवणे गावालगत रविवारी संभू देविदास पाटील यांच्या शेतात शेतकऱ्यांना बिबट्या दिसून आला होता़ ही माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिला होती़ याचदरम्यान जुनवणे गावातील रोहिदास धुडकू चित्ते यांच्या मालकीची शेळी बिबट्याने हल्ला करुन ठार केली़ शेळीला ओढून शेतात नेऊन बिबट्याने फस्त केल्याचे शेतातील अवशेषांवरुन दिसून आल्यानंतर ग्रामस्थांमध्ये चिंता निर्माण झाली आहे़ वनविभागाने येथे पिंजरे लावण्याची मागणी ग्रामस्थांची असून पोलीस पाटील हिरालाल पाटील यांनी वनविभाग व पोलीस ठाण्यात माहिती दिली होती़ शहादा तालुक्यात सध्या बिबट्यांचा संचार वाढल्याने शेतकरी आणि मजूर यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे़ रात्रीअपरात्री शेतशिवारात जाताना गटा-गटाने जावे लागत आहे़तालुक्यातील इस्लामपूर शिवार आणि मध्यप्रदेश हद्दीत बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले आहेत़ यामुळे तेथील बिबट्या या भागात आला असावा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे़ परंतू आवगे परिसरात दिसून येणारा बिबट्या वेगळा असल्याचे वनविभागाने म्हटले आहे़ यामुळे शहादा तालुक्याच्या शेतशिवारात फिरणारे बिबट किती याबाबत शेतकºयांकडून विचारणा होत आहे़ वनविभागाने बिबट्याचा शोध घेऊन त्यास हुसकावून लावावे किंवा पिंजरे लावून बंदिस्त करावे अशी मागणी आवगे-जुनवणे ग्रामस्थांनी केली आहे़