लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : शहरातील इंदिरानगर येथील ७० वर्षीय कोरोना पॉझिटीव्ह वृध्दाचा उपचार घेत असतांना आज मृत्यु झाला तर त्यांच्या संपकार्तील ५२ वर्षीय पुरुष, बोकळझर येथील ६५ वर्षीय पुरुष व खांडबारा येथील दोन महिलांचा कोरोना अहवाल आज पॉझिटीव्ह आल्याने तालुक्याची कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण संख्या २६ वर पोहोचली आहे.गेल्या पाच दिवसात तालुक्यात एकही रुग्ण पॉझिटीव्ह निघाला नाही. मात्र गुरुवारी सायंकाळी उशिरा तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात इंदिरानगर येथील ७० वर्षीय कोरोना पॉझिटीव्ह वृध्दाच्या संपकार्तील इस्लामपुरा भागातील ५२ वर्षीय पुरुष व खांडबारा येथील २२ व २८ वर्षीय दोन महिलांचा समावेश आहे. बोकळझर येथील ६५ वर्षीय वृध्द पुरुष खाजगी उपचारा दरम्यान कोरोना पॉझिटीव्ह झाल्याने त्यांना नाशिक येथुन नंदुरबार येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. या चार रुग्णांच्या वाढीमुळे तालुक्याची कोरोना बाधीत रुग्ण संख्या २६ झाली आहे. या शिवाय तालुक्यातील काही रुग्ण सुरत, नाशिक व इतर ठिकाणी उपचार घेत असल्याने हा आकडा आणखी वाढला आहे. प्रशासनाकडे त्या बाबतची अधिकृत नोंद मात्र उपलब्ध नाही. दरम्यान इंदिरा नगर येथील ७० वर्षीय कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाचा नंदुरबार येथे उपचार घेत असतांना आज मृत्यु झाला. १९ रोजी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. कोरोना बाधीत तीन रुग्णांचा आतापावेतो मृत्यु झाला असून बाधीतांच्या संपकार्तील दोन जण प्राणास मुकले आहेत. २६ बाधीतांपैकी सहा रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. शहरात कोरोनाचा संसर्ग वाढला असुन पावसाळा सुरु झाल्याने नागरीकांच्या चिंता वाढल्या आहेत. मलेरीया व डेंग्युची लागण होण्याची शक्यता गृहीत धरुन नागरीक भयभीत आहेत. सर्दी पडसे व खोकला सदृश निमोनियाचे रुग्ण शहरात दिसून येत आहेत़ खाजगी दवाखान्यात असे रुग्ण उपचार घेत आहेत. प्रशासनाने तातडीने औषध फवारणी करण्याची गरज व्यक्त होत आहे.
नवापूर तालुक्यात कोरोनासह डेंग्यू व मलेरियाचीही भिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 12:46 IST