लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : चौफेर नदीचे उसळते पाणी दिसल्यानंतर जीवाच्या आकांताने मदतीची हाक देणा:या कन्येचा आवाज ऐकून थेट बापानेच पाण्यात उडी टाकून तिला व तिच्या मैत्रीणीला वाचवल्या सुखद प्रसंग गुजर भवाली ता़ नंदुरबार येथे नागरिकांना अनुभवण्यास मिळाला़ शुक्रवारी सकाळी 9 वाजता घडलेल्या या थरारक प्रसंगातून दोघी सुखरुप बचावल्या आहेत़ गुजर भवाली येथील वैशाली हरीराम पाडवी व आशिमा संग्राम पाडवी ह्या सकाळी 9 वाजेच्या सुमारास घरातील कपडे धुण्यासाठी शिवण नदीकाठावर गेल्या होत्या़ स्वच्छपाणी मिळेल यासाठी त्या नदी पात्राच्या मधोमध गेल्या़ यावेळी नदीला गुडघ्याएवढे पाणी असल्याने त्या सहज मधोमध असलेल्या दगडार्पयत पोहोचल्या़ याठिकाणी मजेत एकमेकींसोबत हास्यविनोद करत कपडे धुत असताना अचानक पाणी वाढत असल्याचे त्यांना दिसून आल़े पोहता येत नसल्याने पाण्यातून बाहेर पडण्यासाठी मदत मिळावी म्हणून दोघींनी आरोळ्या मारण्यास सुरुवात केली़ यावेळी नदीकाठालगत हजर असलेले हरीराम पाडवी यांना कन्या वैशाली हीचा आवाज आल्याने त्यांनी जराही विचार न करता पाण्यात उडी मारत दोघी अडकून पडलेल्या दगडार्पयत पोहोचल़े पुरातील दोघी आणि वाचवण्यासाठी मदत करणारे हरीराम दिसून आल्यानंतर गावातील आश्विन गावीत, शंकर गावीत, कैलास गावीत, किरण गावीत यांनीही पाण्यात उडय़ा घेतल्या़ यावेळी इतर ग्रामस्थांनी दोरखंड आणून काठाला बांधून दोघींर्पयत पोहोचवला़ अवघ्या 20 मिनिटांत हा सर्व प्रकार घडला़ दोघींना दोरखंड आणि पोहोणा:यांच्या मदतीने सुखरुप बाहेर काढण्यात आल़े सकाळी घडलेल्या या घटनेनंतर दोघीही सावरल्या असून सुखरुप असल्याची माहिती देण्यात आली आह़े
नंदुरबार तालुक्यातून वाहणा:या शिवण नदीच्या पाण्यात दिवसेंदिवस वाढ होत आह़े यातून गेल्या 15 दिवसात दुस:यांदा अशाप्रकारची घटना घडली आह़े पश्चिम पट्टय़ातील गावांमध्ये नदीच्या पाण्यात वाढ होण्याची सूचना देण्याबाबत प्रशासन उदासिन असल्याचे यातून पुढे येत आह़े नदीत सापडलेल्या दोघींनाही पोहता येत नसले तरी त्यांनी उंच दगड पाहून एकमेकींना आधार देत धीर धरला होता़ या बचाव कार्यानंतर काही वेळातच नदीच्या पाण्यात मोठी वाढ झाली होती़