शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
3
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
4
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
5
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
6
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
7
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
8
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
9
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
10
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
11
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
12
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
13
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
14
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना
15
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
16
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
17
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
18
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
19
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
20
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या

Vidhan Sabha 2019: सासरे, जावाईला दिली हॅटट्रीकची संधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 12:52 IST

मनोज शेलार।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मतदारसंघ निर्मितीपासून नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला. परंतु 1995 च्या निवडणुकीत डॉ.विजयकुमार गावीत हे ...

मनोज शेलार। लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मतदारसंघ निर्मितीपासून नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला. परंतु 1995 च्या निवडणुकीत डॉ.विजयकुमार गावीत हे प्रस्थापितांना आव्हान देत अपक्ष निवडून आले. तेंव्हापासून हा मतदारसंघ काँग्रेसपासून दुरावला. गेल्या 25 वर्षापासून मतदारसंघात डॉ.गावीत हेच प्रतिनिधीत्व करीत आहेत. असे असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मात्र काँग्रेस अर्थात चंद्रकांत रघुवंशी यांचेच वर्चस्व कायम राहिले आहे.  महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासूनच नंदुरबार हा स्वतंत्र मतदारसंघ राहिला आहे. स्थापनेच्या पहिल्याच वर्षी अर्थात 1962 च्या पहिल्या निवडणुकीत मतदारसंघ सर्वसाधारण गटासाठी होता. परंतु नंतरच्या सर्वच निवडणुकांमध्ये हा मतदारसंघ एस.टी.प्रवर्गासाठी राखीव राहिला आहे. मतदारसंघावर 1962 ते 1995 र्पयत माजी आमदार कै.बटेसिंह रघुवंशी यांची अर्थात काँग्रेसची पकड होती. त्यांच्या काळात माजी गृहराज्यमंत्री व आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांचे सासरे कै.आर.पी.वळवी यांनी 1967 ते 1985 र्पयत नेतृत्व केले. सतत चार वेळा निवडून आल्याने कै.वळवी यांना काँग्रेसने गृहराज्यमंत्री बनविले.  परंतु 1985 च्या निवडणुकीत त्यांना काँग्रेसने तिकीट दिले नाही. त्यांच्या ऐवजी प्रा.इंद्रसिंग वसावे यांना तिकिट दिल्याने ते निवडून आले. त्यांच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीनंतर काँग्रेसने पुन्हा 1990 मध्ये उमेदवार बदलला. पंचायत समितीचे माजी सभापती प्रताप रुपजी वळवी यांना काँग्रेसने तिकिट दिले ते देखील निवडून आले. तब्बल 33 वर्ष काँग्रेसकडे असलेला हा मतदारसंघ 1995 च्या निवडणुकीत मात्र काँग्रेसपासून दुरावला.विजयकुमार गावीत यांची एण्ट्रीमतदारसंघात काँग्रेसविरोधी वातावरण निर्माण झाले होते. लोकांना बदल हवा असे वातावरण निर्माण करण्यात आले. त्यासाठी सक्षम उमेदवाराची शोधाशोध सुरू झाली. राजकीय पाश्र्वभुमी लाभलेले आणि उच्चशिक्षीत उमेदवार म्हणून डॉ.विजयकुमार गावीत यांना विरोधकांनी निवडणुकीसाठी तयार केले. 1995 च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून डॉ.गावीत मोठय़ा मताधिक्याने निवडून आले. तेंव्हापासून मात्र  त्यांचेच वर्चस्व या मतदारसंघात राहिले आहे. पहिल्याच टर्ममध्ये त्यांना राज्यमंत्रीपद मिळाले. त्यानंतर 1999 मध्ये राष्ट्रवादीचा उदय झाला. शरद पवार यांनी डॉ. गावीत यांना राष्ट्रवादीत प्रवेश देवून तिकीटही दिले.  राष्ट्रवादीच्या तिकिटावर डॉ.गावीत तीन टर्म निवडून आले. तिन्ही टर्ममध्ये त्यांना कॅबीनेट मंत्रीपद मिळाले. आता 2019 च्या निवडणुकीत बरेच राजकीय फेरबदल झालेले आहेत. 

 नंदुरबार मतदार संघातील योगायोग असा की दुस:या निवडणुकीपासून पाचव्या निवडणुकीर्पयत सलग चार वेळा निवडून आलेले कै.आर.पी.वळवी हे आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांचे सासरे होते. सास:यांचा विजयाचा कित्ता डॉ.गावीत यांनीही गिरविला. ते देखील सलग पाच वेळा निवडून आले आहेत. कै.वळवी हे एकाच पक्षातून निवडून येत तर डॉ.गावीत यांनी दोन वेळा पक्ष बदलला आहे. मतदार संघातील हा देखील एक योगायोगच म्हणता येईल. 1995 र्पयत मतदार संघात आमदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकाच पक्षाचे वर्चस्व  होते. नंतर अर्थात 1995 पासून हे सूत्र बदलले. आमदार एका पक्षाचा तर स्थानिक स्वराज्य संस्था या दुस:या पक्षाकडे असे चित्र तयार झाले आहे. त्यामुळे तेंव्हापासून गावागावात दोन गट पडले. दोन पक्षांचे कार्यकर्ते निर्माण झाले आणि त्यातून राजकीय वर्चस्वासाठी स्पर्धा निर्माण झाली. ती आजतागायत सुरू आहे. आता राजकीय समिकरणे बदलली असली तरी येणा:या काळाची प्रतिक्षा आहेच.

 नंदुरबार मतदरासंघ सर्वसाधाण व्हावा यासाठी पुरेपूर प्रय} झाला. त्यानुसार 2008 मध्ये झालेल्या मतदार संघांच्या पुनर्रचनेत हा मतदारसंघ नंदुरबार शहरापासून थेट शिरपूर तालुक्याच्या सिमेर्पयत विस्तारीत करण्यात आला. परिणामी आदिवासी मतदारांची संख्या कमी झाली. परंतु राज्यातील आदिवासी मतदार संघांच्या एकुण संख्या होत नसल्याने नंदुरबारचही त्यात समावेश झाला. परिणामी सर्वसाधारण मतदार संघाचे स्वप्न भंगले.मतदार संघाचे पहिले आमदार कै.गजमल तुळशीराम पाटील अर्थात जी.टी.बापुजी यांचे तालुक्यात प्रस्थ होते. त्यांनी नंदुरबारात शैक्षणिक संस्था देखील सुरू केली.  त्या माध्यमातून अनेक वर्ष त्यांनी समाजसेवा व राजकारण केले. पंचायत समितीचे ते सभापती व विविध पदांवर देखील होते.